नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By Admin | Updated: July 8, 2014 01:15 IST2014-07-08T01:15:04+5:302014-07-08T01:15:04+5:30
पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणाकडून पावणेदोन लाख रुपये हडपले. २०१० ते २०११ या कालावधीत झालेल्या

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
पावणेदोन लाख हडपले : निलंबित पोलिसाचे कृत्य
नागपूर : पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणाकडून पावणेदोन लाख रुपये हडपले. २०१० ते २०११ या कालावधीत झालेल्या या फसवणुकीची तक्रार आता पोलिसांना मिळाली. जमिल शेख असे आरोपीचे नाव असून, तो निलंबित पोलीस कर्मचारी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मेंढा (ता. नागभिड) येथील विजय वाल्मिक सहारे (वय २८) हा तरुण फेब्रुवारी २०१० मध्ये पोलीस भरतीसाठी आला होता. त्यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या आरोपी जमिल शेख याने त्याला गाठले. ‘खर्चा-पाणी‘ केल्यास नोकरी लावून देऊ, असे त्याने सांगितले. आपले येथील अधिकाऱ्यांसोबत घनिष्ट संबंध असल्याचे सांगून विश्वास बसावा म्हणून आरोपी जमिल विजयला पोलीस मुख्यालयात नेत होता. त्यामुळे विजयचा विश्वास बसला. पोलीस गणवेषातच जमिलने शिवणकेंद्राजवळ विजयकडून वेळोवेळी १ लाख ८५ हजार घेतले. तीन वर्षांपासून प्रत्येक भरतीच्या वेळी तो ‘अब तुम्हारा काम हो गया‘, असे सांगत होता. मात्र, या भरतीतही विजयला नोकरी मिळाली नाही. आरोपीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर विजयने गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी जमिलविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्याचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)