नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, महिलेचे ८० हजार हडपले

By Admin | Updated: August 13, 2016 14:22 IST2016-08-13T14:22:04+5:302016-08-13T14:22:04+5:30

नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेकडून ८० हजार रुपये हडपणा-या जरीपटक्यातील एका दाम्पत्याविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Cheating, 80,000 victims of the woman by showing bait for the job | नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, महिलेचे ८० हजार हडपले

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, महिलेचे ८० हजार हडपले

>ऑनलाइन लोकमत
नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेकडून ८० हजार रुपये हडपणा-या जरीपटक्यातील एका दाम्पत्याविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकाश अजाबराव मेश्राम आणि त्याची पत्नी संध्या प्रकाश मेश्राम अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत.
आरोपी प्रकाश मेश्राम जरीपटक्यातील भीम चौक, इंदोरा भागात राहतो. तो स्वत:ला नेता म्हणवून घेतो. याला त्याला कोणतेही काम करून देण्याची बतावणी करणा-या मेश्राम दाम्पत्यासोबत विणा सतीश कापसे (वय ३५, रा. वकिलपेठ, इमामवाडा) यांची ओळखी आहे.
सरकारी रुग्णालयात स्टाफ नर्सची नोकरी मिळावी म्हणून त्या प्रयत्नशिल होत्या. आरोपी मेश्रामने विणा कापसे यांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्या बदल्यात कापसे यांच्याकडून ८० हजार रुपये घेतले. जानेवारी २०१३ ते २८ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत हा व्यवहार पार पडला. मात्र पैसे घेतल्यानंतर मेश्राम दाम्पत्याने कापसे यांना टाळणे सुरू केले. नंतर पैसे परत देण्याची त्यांनी तयारी दाखवली. परंतू, नेहमी वेगवेगळे कारण सांगून आरोपी मेश्राम पैसे परत करण्यासही टाळू लागले. त्यामुळे कापसे यांनी इमामवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी मेश्राम दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Cheating, 80,000 victims of the woman by showing bait for the job