फेसबुक फ्रेंडने फसवले, शरीरसंबंधानंतर लग्नास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:52+5:302021-04-05T04:07:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऑनलाइन मैत्री झाल्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि नंतर लग्नास ...

फेसबुक फ्रेंडने फसवले, शरीरसंबंधानंतर लग्नास नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑनलाइन मैत्री झाल्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि नंतर लग्नास नकार दिला, अशी दोन वेगवेगळी प्रकरणे हुडकेश्वर आणि सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
हुडकेश्वरमधील २० वर्षीय तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, सिल्ली तरोडा (जि. गोंदिया) येथील विक्रम बोंद्रे (वय२१) याच्यासोबत तिची फेसबुकवर ओळख झाली. मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ३० मार्चला आरोपी बोंद्रे त्याचा अतुल नामक मामेभावासोबत नागपुरात आला. आई आणि बहिणीला भेटून येऊ असे म्हणत तरुणीला दुचाकीवर बसवले आणि तिरोड्याला नेले. तेथे एका लॉजवर आरोपी बोंद्रेने तिच्यासोबत शरिरसंबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या दिवशी तिला मानेवाडा चाैकात आणून सोडले आणि नंतर लग्नाचा विषय काढला असता नकार दिला. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने तरुणीने हुडकेश्वर ठाण्यात शनिवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी विक्रम बोंद्रे आणि त्याचा मामेभाऊ अतुल या दोघांवर अपहरण करून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला.
शादी डॉट कॉमवर भेटगाठ
अशाच प्रकारे तिवसा (जि. अमरावती) येथील प्रथमेश सुरेंद्र सोहळे (वय २३) याची सदरमधील एका तरुणीसोबत (वय २१) शादी डॉट कॉमवर ओळख झाली होती. १८ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान आरोपी अनेकदा नागपुरात आला. तरुणीचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखवल्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी वारंवार शरीरसंबंध जोडले आणि नंतर लग्नास नकार दिला. त्यामुळे तरुणीने सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी केली जात आहे.
----