शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

चौकीदार पसरवतोय हिंदू-मुस्लीम द्वेष : असदुद्दीन ओवेसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 10:04 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्यानुसार भारत हे एक धर्माचे राष्ट्र कधीच राहू शकत नाही. अनेक धर्मांचा हा देश आहे. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा कशी आहे. पंतप्रधान असूनही ते हिंदू-मुस्लीमच्या गोष्टी करतात. स्वत:ला चौकीदार म्हणवणारे पंतप्रधानच हिंदू-मुस्लीम द्वेष पसरवित आहेत, असा आरोप एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला.

ठळक मुद्देमोदींना चर्चेचे खुले आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्यानुसार भारत हे एक धर्माचे राष्ट्र कधीच राहू शकत नाही. अनेक धर्मांचा हा देश आहे. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा कशी आहे. पंतप्रधान असूनही ते हिंदू-मुस्लीमच्या गोष्टी करतात. स्वत:ला चौकीदार म्हणवणारे पंतप्रधानच हिंदू-मुस्लीम द्वेष पसरवित आहेत, असा आरोप एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला.नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर डबरासे आणि किरण पाटणकर-रोडगे यांच्या प्रचारार्थ सोमवारी उत्तर नागपुरातील इंदोरा मैदानात आयोजित जाहीर सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह राजू लोखंडे, वनमाला उके, शहराध्यक्ष रवी शेंडे, प्रकाश टेंभुर्णे उपस्थित होते. यावेळी ओवेसी म्हणाले, हिंदू-मुस्लीमवर चर्चा करायचीच असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी चर्चा करावी, ते पाच मिनिटेही माझ्यासमोर टिकू शकणार नाही. हिंदू-मुस्लीम द्वेष परवता मग महात्मा गांधी यांना गोळी घालून ठार करणार नाथुराम गोडसे हा दहशतवादी आहे की नाही, असा प्रश्न करीत या देशाला तोडणारी नव्हे तर जोडणाऱ्या विचारधारेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा संविधानाच्या गोष्टी करते, परंतु गेल्या पाच वर्षात संविधान कमजोर करण्याचे काम यांनीच केले. देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भात गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या. या आत्महत्या चौकीदाराला दिसत नाही का,असा सवालही त्यांनी केला.काँग्रेसला लकवा मारलाय : प्रकाश आंबेडकरप्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसला लकवा मारलाय आणि निवडणुका संपेपर्यंत त्यांचा हा लकवा नरेंद्र मोदी दूर होऊ देणार नाही. भाजपाविरुद्ध कुणीही सहज जिंकू शकते. खरा रोल येथील फुले-शाहू आंबेडकरी लोकांचा आहे. गेली साडेचार वर्ष ते बिळात घुसून होते, बाहेर पडलेच नाही. त्यांनी किमान मतदानासाठी तरी बाहेर पडावं, असा टोलाही त्यांनी बुद्धिजीवींना लगावला.केवळ अजित पवारांना वाचविण्यापुरतीच ताकदयावेळी ओवेसी यांनी शरद पवार यांच्यावरही प्रहार केला. शरद पवार यांच्यात केवळ अजित पवार यांना वाचवण्यापुरतीच ताकद शिल्लक असल्याी टीका केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी