शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्वेदी समर्थकांनी शोधला पटोलेंमध्ये आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:51 IST

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा हादरा बसला. महापालिकेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या कार्यालयात चतुर्वेदी समर्थक नगरसेवक, नेते व कार्यकर्ते जमले. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष झालेल्या माजी खासदार नाना पटोले यांना तेथे निमंत्रित केले. चतुर्वेदी पक्षातून गेल्यामुळे त्यांचे समर्थक पटोलेंमध्ये आधार शोधताना दिसले.

ठळक मुद्दे महापालिकेत घेतली बैठक : पटोलेंची सावध भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा हादरा बसला. महापालिकेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या कार्यालयात चतुर्वेदी समर्थक नगरसेवक, नेते व कार्यकर्ते जमले. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष झालेल्या माजी खासदार नाना पटोले यांना तेथे निमंत्रित केले. चतुर्वेदी पक्षातून गेल्यामुळे त्यांचे समर्थक पटोलेंमध्ये आधार शोधताना दिसले.पण पटोले यांनी आपण स्वत:हून नाही तर निमंत्रणावर येथे आल्याचे स्पष्ट करीत गटबाजीपासून स्वत: दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. चतुर्वेदींवरील कारवाईचे वृत्त पसरताच महापालिकेतील काँग्रेसच्या गटात हालचाली सुरू झाल्या. तानाजी वनवे काही वेळासाठी कार्यालय सोडून बाहेर गेले. त्यानंतर परत आल्यावर त्यांनी पटोले येत असल्याचे सांगत पुष्पगुच्छ मागविला. कक्षात वनवे यांच्यासह माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार अशोक धवड, यादवराव देवगडे, नगरसेवक बंटी शेळके, सय्यदा बेगम, दिनेश यादव, यशवंत कुंभलकर यांच्यासह कार्यकर्ते गोळा झाले. पटोले आल्यामुळे चतुर्वेदी समर्थकांचे दडपण कमी झाल्याचे दिसले.चतुर्वेदींवरील कारवाईची माहिती नाही : पटोलेपटोले यांनी नागपूरच्या गटबाजीच्या विषयापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. चतुर्वेदी यांच्या निष्कासनाबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वीच आपल्यावर पक्षाने जबाबदारी सोपविली आहे. चतुर्वेदींवरील कारवाईची आपल्याला माहिती नाही. नागपुरातून लोकसभा लढण्याच्या प्रश्नावर पक्ष सोपवेल ते काम करू, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस