रशियाहून नागपूरकडे रवाना होणार चार्टर फ्लाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 09:44 PM2020-07-04T21:44:10+5:302020-07-04T21:45:35+5:30

कोविड-१९ महामारीमुळे रशियात फसलेले १०० पेक्षा जास्त प्रवासी नागपूरकडे रविवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने रवाना होणार आहे. रशियातून रवाना झाल्यानंतर विमान प्रारंभी दिल्ली येथे पोहोचेल आणि त्यानंतर दिल्लीहून नागपूरकडे रवाना होईल.

Charter flight from Russia to Nagpur | रशियाहून नागपूरकडे रवाना होणार चार्टर फ्लाईट

रशियाहून नागपूरकडे रवाना होणार चार्टर फ्लाईट

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ महामारीमुळे रशियात फसलेले १०० पेक्षा जास्त प्रवासी नागपूरकडे रविवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने रवाना होणार आहे. रशियातून रवाना झाल्यानंतर विमान प्रारंभी दिल्ली येथे पोहोचेल आणि त्यानंतर दिल्लीहून नागपूरकडे रवाना होईल.
‘वंदे भारत’ अभियानांतर्गत रशियातून रवाना होणारे विमान सोमवारी मध्यरात्रीनंतर ४.१५ वाजता नागपुरात पोहोचणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशात फसलेल्या नागरिकांना परत आणण्यासह आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, ग्लोब्ज, सॅनिटायझरचा उपयोग करण्यात येत आहे. विमातळावर कार्यरत कर्मचारी या बाबींवर विशेष लक्ष देत आहेत. रशियातून येणारे प्रवासी कोणत्या शहरातील आहेत, हे एअर इंडियाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील बहुतांश प्रवासी विदर्भातील आहेत.

दोहाहून आलेत १५७ प्रवासी
शुक्रवारी दोहाहून नागपुरात १५७ प्रवासी आलेत. यामध्ये ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत इंडिगोच्या चार्टर विमानाने प्रवाशांना नागपुरात आणण्यात आले. हे विमान दुपारी ४.२० वाजता पोहोचले. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता मुंबईकडे रवाना झाले.

१९ पर्यंत कोलकाताचे उड्डाण नाही
६ ते १९ जुलैदरम्यान नागपूरहून कोलकाताकडे होणारे उड्डाण बंद राहणार आहे. कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारच्या विनंतीवरून कोलकाताहून नागपूरसह दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई आणि अहमदाबाद उड्डाणावर बंदी आणली आहे. कोलकाता विमानतळाने टिष्ट्वटरवर ही माहिती प्रकाशित केली आहे. शनिवारी प्रकाशित करण्यात आलेल्या शेड्युलमध्ये नागपूरहून कोलकाताकरिता ५जुलैला (रविवार) इंडिगोचे विमान ६ई ४०३ रात्री ८.०५ वाजता उपलब्ध आहे.

Web Title: Charter flight from Russia to Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.