रेतीची चाेरटी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:32+5:302021-02-06T04:13:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : विना राॅयल्टी रेतीची चाेरटी वाहतूक करणारे मालवाहू पिकअप वाहन जुनी कामठी पाेलिसांनी पकडले. त्यात ...

रेतीची चाेरटी वाहतूक
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : विना राॅयल्टी रेतीची चाेरटी वाहतूक करणारे मालवाहू पिकअप वाहन जुनी कामठी पाेलिसांनी पकडले. त्यात चार लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई खैरी शिवारात बुधवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
जुनी कामठी ठाण्याचे पाेलीस पथक गस्तीवर असताना, आराेपी वाहनचालक ज्ञानेश्वर श्रीवत मेश्राम (२१, रा. बिनासंगम, ता. कामठी) हा एमएच-४०/बीजी-६०६४ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून कन्हान नदी बिना रेतीघाटातून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करताना आढळून आला. पाेलिसांनी मालवाहू वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनचालकाकडे रेतीची राॅयल्टी आढळून न आल्याने पाेलिसांनी सदर वाहन जप्त केले. या कारवाईत पाेलिसांनी रेतीसाठा व मालवाहू वाहन असा एकूण चार लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी जुनी कामठी पाेलिसांनी भादंवि कलम ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपी वाहनचालकास अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार विजय मालचे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे प्रशांत सलाम, पवन गजभिये, अंकुश गजभिये यांच्या पथकाने केली.