‘डीआरडीओ’च्या चित्ररथाचे सारथ्य नागपूरकर ‘कमांडर’कडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:54+5:302021-02-05T04:44:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रजासत्ताकदिनानिमित्त राजपथ येथे होणाऱ्या संचलनात ‘डीआरडीओ’च्या चित्ररथाकडे अनेकांचे डोळे लागले आहे. या चित्ररथात नौदलासाठी ...

‘डीआरडीओ’च्या चित्ररथाचे सारथ्य नागपूरकर ‘कमांडर’कडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रजासत्ताकदिनानिमित्त राजपथ येथे होणाऱ्या संचलनात ‘डीआरडीओ’च्या चित्ररथाकडे अनेकांचे डोळे लागले आहे. या चित्ररथात नौदलासाठी विकसित केलेल्या ‘एलसीए’ नेव्ही (लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) आणि ‘अॅन्टी टँक गायडेड मिसाईल’चे सादरीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ‘एलसीए’चे सारथ्य नागपूरकर व नौदलाचे ‘कमांडर’ अभिषेक चंद्रकांत गावंडे हे करणार आहेत.
‘डीआरडीओ’चे यंदा दोन चित्ररथ राहणार आहेत. यातील ‘एलसीए नेव्ही’च्या चित्ररथाचे नेतृत्व गावंडे यांच्याकडे आहे. युद्धनौकेवरून लहान ‘रन-वे’वरून झेप घेणाऱ्या लढाऊ विमानाचे सादरीकरण राहणार आहे. यात ‘टेकऑफ’, ‘लँडिंग’ आणि ‘लिफ्ट ऑपरेशन्स’चा समावेश असेल. ‘आयएनएस विक्रमादित्य’ या युद्धनौकेवरून कशाप्रकारे ‘एलसीए’चे संचलन होते, यावर हे सादरीकरण असेल. अभिषेक गावंडे यांच्याकडे याची मुख्य जबाबदारी आहे. अभिषेक यांचे वडील चंद्रकांत गावंडे हे नागपूरचे असून ‘एमएसईबी’ला अभियंता होते. या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात देशाची प्रमुख संशोधन संस्था असलेल्या ‘डीआरडीओ’ची कामगिरी जनतेसमोर येणार आहे. ‘एलसीए-नेव्ही’ हे भारताचे पहिले फोर स्टार ‘स्टोबार’ (स्काय जम्प टेकऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी) लढाऊ विमान असून, विमानवाहू युद्धनौकेतून याचे संचलन शक्य आहे.