उमरेड येथे चाेरी, राेख ७० हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:19 IST2021-09-02T04:19:23+5:302021-09-02T04:19:23+5:30

उमरेड : शहरातील श्री नारायणनगर येथे अज्ञात चाेरट्याने राेख ७० हजार रुपये लंपास केले. वन विभागाचे कर्मचारी योगेश अंबागडे ...

Chari at Umred, line 70,000 lamps | उमरेड येथे चाेरी, राेख ७० हजार लंपास

उमरेड येथे चाेरी, राेख ७० हजार लंपास

उमरेड : शहरातील श्री नारायणनगर येथे अज्ञात चाेरट्याने राेख ७० हजार रुपये लंपास केले. वन विभागाचे कर्मचारी योगेश अंबागडे यांच्याकडे हा प्रकार बुधवारी (दि.१) दुपारच्या सुमारास उघडकीस आला. अंबागडे हे एम. डी. उरकुडे यांच्याकडे भाडेकरू म्हणून वास्तव्याला आहेत.

शनिवारी (दि.२८) राेजी योगेश अंबागडे हे कुटुंबीयांसह नागपूर येथे आपल्या घरी कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने गेले होते. दरम्यान, बुधवारी दुपारच्या सुमारास अंबागडे कुटुंबीय परत आल्यानंतर त्यांना बेडरूमच्या मागील गॅलरीचा दरवाजा उघडा दिसला. शिवाय आलमारीमधील कपडे आणि साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. आलमारीच्या लाॅकरमध्ये ठेवलेले राेख ७० हजार रुपये चाेरट्याने चाेरून नेल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. याबाबत त्यांनी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. चाेरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Chari at Umred, line 70,000 lamps