बारमध्ये चाेरी, विदेशी दारू लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:12 IST2021-04-30T04:12:00+5:302021-04-30T04:12:00+5:30
उमरेड : लाॅकडाऊनमुळे बंद असलेल्या बारमधून अज्ञात आराेपीने ६८ हजार २१९ रुपये किमतीची विविध विदेशी कंपनीची दारू चाेरून नेली. ...

बारमध्ये चाेरी, विदेशी दारू लंपास
उमरेड : लाॅकडाऊनमुळे बंद असलेल्या बारमधून अज्ञात आराेपीने ६८ हजार २१९ रुपये किमतीची विविध विदेशी कंपनीची दारू चाेरून नेली. ही घटना उमरेड शहरातील कळमना मार्गावरील एस.एस. बार येथे मंगळवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास घडली.
गणेश श्रीराम दुरूगकर (३८, रा. नारायण अपार्टमेंट, गॅस गाेडाऊन समाेर, बायपास, उमरेड) यांच्या बारचे दार उघडे असून, बारमागे दारूची पेटी पडून असल्याची सूचना बारलगतचे रहिवासी दुष्यंत लांडगे यांनी फाेनद्वारे दिली. लगेच गणेश दुरूगकर व बार व्यवस्थापकाने बारची पाहणी केली असता, बारच्या शटरचे कुलूप तुटलेले व शटर अर्धवट उघडे दिसून आले. तसेच बारमधील विविध विदेशी कंपनीची एकूण ६८ हजार २१९ रुपये किमतीची दारू चाेरट्याने चाेरून नेल्याचे आढळून येताच दुरूगकर यांनी पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. पाेलिसांनी बारमधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता, दाेन-तीन अनाेळखी आराेपींनी बारमध्ये चाेरी केल्याचे दिसून आले. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८०, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपींचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक डाेर्लीकर करीत आहेत.