काेंढाळी येथील बेकरीत चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:08 IST2021-02-24T04:08:15+5:302021-02-24T04:08:15+5:30

काेंढाळी : चाेरट्याने बेकरीचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना ...

Chari in the bakery at Kaendhali | काेंढाळी येथील बेकरीत चाेरी

काेंढाळी येथील बेकरीत चाेरी

काेंढाळी : चाेरट्याने बेकरीचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) येथे साेमवारी (दि. २२) पहाटेच्या सुमारास घडली.

काेंढाळी येथील बसस्थानकासमाेरील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेच्या बाजूला नितेश दिनेशचंद्र त्रिपाठी (३७, रा. कोंढाळी, ता. काटाेल) यांनी नितेश नामक बेकरी आहे. अज्ञात चाेरट्याने साेमवारी पहाटेच्या सुमारास त्या बेकरीचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि ड्रावरमधील ७ हजार रुपये राेख घेऊन पळ काढला. हा प्रकार सकाळी नितेश यांच्या निदर्शनास आल्यााने त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. ही चाेरी तिघांनी केली असून, ते दुकानातील सीसी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, अशी माहिती पाेलीस उपनिरीक्षक देवेंद्र साेनावले यांनी दिली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, तपास सहायक फाैजदार दिलीप इंगळे करीत आहेत.

Web Title: Chari in the bakery at Kaendhali