शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दुप्पट रकमेचे आमिष, आठवड्याला कॅश अन् शेवटी लाखोंनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 15:22 IST

आर्थिक शाखेला तपासात आरोपींनी नागरिकांची १७.८५ लाखाने फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देट्रेड मनी कंपनीचे अनेकजण शिकार११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : गुंतवणूक केलेली रक्कम १८ महिन्यात दुप्पट करून देण्याचे तसेच दर आठवड्याला प्रोत्साहनपर रक्कम देण्याची बतावणी करून नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. नंदनवन पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राथमिक तपासात १७.८५ लाखांनी फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. तपासात ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. विनोद दादाजी उपरे (५०, द्वारका अपार्टमेंट खामला), शैलेश तल्हार (४५, मनीषनगर), पुरुषोत्तम चाचरे (३०, जुनी कामठी), मंगला अंबोलकर (५०), ऋषिकेश अंबोलकर (५५, पायोनिअर सोसायटी), प्रमोद डोंगरे (गडचिरोली), अतुल डोंगरे (हुडकेश्वर), समीर जैन (२५, प्रतापनगर), मोहन राणा (४५) आणि इंदू राणा (३८, गुलमोहर हॉल, खामला) अशी आरोपींची नावे आहेत.  विनोद उपरे असे मुख्य आरोपीचे नाव आहे.

उपरेने २०२० मध्ये ट्रेड मनी कंपनी सुरू केली. त्यात इतर आरोपींना सामील केले. आरोपी नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करीत होते. त्यांनी गुंतवणूकदारांना ठराविक रक्कम ठरवून दिलेल्या काळापर्यंत जमा केल्यास १८ आठवड्यांनंतर दुप्पट रक्कम परत देण्याची बतावणी केली. त्यांनी दुप्पट रक्कम देण्यासोबतच प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यावर विश्वास ठेवून व्यंकटेशनगर येथील रहिवासी राकेश चौरागडे आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यात गुंतवणूक केली. सुरुवातीला आरोपींनी गंतवणूकदारांना पैसे परत केले. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या वाढू लागली.

चौरागडे आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोपींकडे ६ लाख रुपये गुंतविले. त्यांनी ठरलेल्या वेळेवर पैसे परत करण्याची मागणी केली असता आरोपी टाळाटाळ करू लागले. चौरागडे यांना आरोपींनी इतर नागरिकांनाही रक्कम परत केली नसल्याची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. आर्थिक शाखेला तपासात आरोपींनी १७.८५ लाखाने फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. त्या आधारे नंदनवन पोलिसांनी फसवणूक, गुन्हेगारी षडयंत्र तसेच एमपीआयडीनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणातील सत्यस्थिती समोर येऊ शकणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीMONEYपैसा