शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

कोळशाच्या ओव्हरलोड ट्रकने विद्यार्थ्यास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 19:47 IST

सायकलने शाळेत जात असतानाच कोळशाने ओव्हरलोड असलेल्या ट्रकने विद्यार्थ्यास चिरडले. हृदय हेलावून टाकणारा हा अपघात सोमवारी (दि.१४) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकात झालेल्या या अपघातातील मृत विद्यार्थ्याचे नाव प्रणव संजय ठुसे (१२, रा. कुंभारी, ता. उमरेड) असे आहे. प्रणव उमरेडच्या संस्कार विद्यासागरचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी होता. एमएच-३४/एव्ही-२३५९ या क्रमांकाचा ट्रक गोकुल खदान येथून नागपूरच्या दिशेने जात होता. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताचे वृत्त पसरताच घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या बायपास चौकातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (उमरेड) : सायकलने शाळेत जात असतानाच कोळशाने ओव्हरलोड असलेल्या ट्रकने विद्यार्थ्यास चिरडले. हृदय हेलावून टाकणारा हा अपघात सोमवारी (दि.१४) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकात झालेल्या या अपघातातील मृत विद्यार्थ्याचे नाव प्रणव संजय ठुसे (१२, रा. कुंभारी, ता. उमरेड) असे आहे. प्रणव उमरेडच्या संस्कार विद्यासागरचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी होता. एमएच-३४/एव्ही-२३५९ या क्रमांकाचा ट्रक गोकुल खदान येथून नागपूरच्या दिशेने जात होता. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताचे वृत्त पसरताच घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती.मूळ कुंभारी येथील रहिवासी असलेले ठुसे कुटुंबीय आंबेडकर कॉलनी, शिवनगर येथे वर्षभरापासून किरायाच्या खोलीत वास्तव्य करीत होते. नेहमीप्रमाणे प्रणव सायकलने शाळेत जाण्यासाठी निघाला. आंबेडकर कॉलनी येथून बायपास चौक ओलांडूनच शाळेच्या दिशेने पुढे जावे लागते. प्रणव आपल्या मित्रांसोबत सायकलने जात असताना अचानक ट्रकची धडक लागली. तो सायकलसह खाली कोसळला. चाकाखाली आला. यात प्रणव जागीच ठार झाला. प्रणवच्या हात आणि पायावरून ट्रकचे चाक गेले. खाली कोसळला. यामुळे त्याच्या डोक्यालाही जबर मार बसला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला लागलीच घटनास्थळावरून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी तपासणीअंती प्रणवला मृत घोषित करण्यात आले. २७९, ३०४ अ, भादंवि सहकलम १८४, मोटर वाहन कायदा अन्वये उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक संग्रामसिंग चव्हाण करीत आहेत.मृत प्रणवचे वडील संजय ठुसे हे पवनी परिसरातील वलनी येथे विद्युत विभागात कर्तव्यावर आहेत. तत्पूर्वी ते पुणे येथे कार्यरत होते. मागील वर्षी वलनी येथे बदली झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबीय उमरेड येथे वास्तव्य करू लागले. मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि लगतच असलेल्या कुंभारी येथील गावच्या शेतीकडेही लक्ष देता येईल, याउद्देशाने हे कुटुंबीय आंबेडकर ले-आऊट येथे किरायाच्या खोलीत राहत होते. अशातच या अपघातात प्रणवचा जीव गेल्याने संपूर्ण कुटुंबीयांवर आभाळच कोसळले.‘ते’ थोडक्यात बचावलेप्रणवसोबत त्याचे अन्य चार मित्रदेखील सायकलने शाळेत जात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून भरधाव वेगाने ट्रक डाव्या बाजूने नागपूरच्या दिशेकडे वळत असतानाच प्रणवचे अन्य मित्र तातडीने पुढे निघाले. प्रणव मात्र ट्रकच्या चाकातच सापडला. अन्य मित्र भीतीने थबकले असते तर खूपच भयंकर चित्र समोर आले असते, असेही बोलल्या जात आहे. प्रणवच्या अपघातानंतर घटनास्थळी अनेकांनी आपला संताप व्यक्त केला.शाळेत गेला कशाला?प्रणव मरण पावल्याची बाब त्याच्या आईच्या कानावर पडताच त्या तातडीने ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्या. अगदी काही क्षणापूर्वी ‘आई मी जातो’ असे म्हणत जाणारा प्रणव रक्तबंबाळ अवस्थेत बेडवर मृतावस्थेत पाहून ती खालीच कोसळली. ‘तू शाळेत गेला कशाला’ असे म्हणत ती धाय मोकलून रडू लागली. तिच्या शेजारीच शाळेतील शिक्षिकांनी प्रणवच्या आईस सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिक्षिकांसह सारेच गलबलून गेले.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थी