शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

गौतमीच्या कार्यक्रमात तुफान राडा, खुर्च्यांची तोडफोड, नागपुरात नक्की काय घडलं?

By योगेश पांडे | Updated: September 30, 2023 11:22 IST

नागपूरला पुराचा फटका बसला असतानाही लावणीचा कार्यक्रम

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूरला पुराचा मोठा फटका बसल्यानंतर देखील सामाजिक भान न बाळगत चक्क गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला संबंधित कार्यक्रमात परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे माजी आमदारांच्या मार्गदर्शनातच संबंधित गणेशोत्सवाचे आयोजन होते.

हिल टॉप येथील एकता गणेशोत्सव उत्सव मंडळाच्यावतीने नृत्यांगना गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात काही हुल्लडबाजांनी गोंधळ घातला. प्रचंड गर्दी झाल्याने रेटारेटी सुरू झाली व बॅरिकेड्स काढण्याचा प्रयत्न झाला. काही युवकांनी खुर्च्यांची तोडफोड केली आणि खुर्च्यांचे तुकडे हवेत भिरकावले, त्यामुळे गोंधळ उडाला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

या प्रकरणी गणेशोत्सव मंडळाकडून पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यात आली नाही. नागपुरात पुराचा फटका बसला असताना माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली संचालित होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

या प्रकरणी गणेशोत्सव मंडळ किंवा मारामारी करणाऱ्या युवकांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी प्रतिक्रिया अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली.

टॅग्स :Gautami Patilगौतमी पाटीलnagpurनागपूर