डेमू गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

By Admin | Updated: June 29, 2014 00:41 IST2014-06-29T00:41:34+5:302014-06-29T00:41:34+5:30

रेल्वे प्रशासनाने गोंदिया-बालाघाट या भागातील डेमू सेवांसाठी १ जुलैपासून नवे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. डेमू ७८८२१/७८८२२ गोंदिया-बालाघाट-गोंदियासोबत डेमू क्रमांक ७८८०३/७८८०४ गोंदिया

Changes in the schedule of DEMU trains | डेमू गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

डेमू गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

नागपूर : रेल्वे प्रशासनाने गोंदिया-बालाघाट या भागातील डेमू सेवांसाठी १ जुलैपासून नवे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. डेमू ७८८२१/७८८२२ गोंदिया-बालाघाट-गोंदियासोबत डेमू क्रमांक ७८८०३/७८८०४ गोंदिया-वारासिवनी-गोंदियाचा कटंगीपर्यंत विस्तार केला.
७८८०१ गोंदिया-कटंगी गोंदियावरून सकाळी ५.१५ वाजता सुटेल. ही गाडी बालाघाटला ६.२० वाजता पोहोचून ६.२५ वाजता सुटेल. वारासिवनीला ६.५० वाजता पोहोचून ६.५२ वाजता सुटेल. कटंगीला ७.४५ वाजता पोहोचेल. ७८८०३ गोंदिया-कटंगी गोंदियावरून सकाळी ८.३५ वाजता सुटेल. बालाघाटला सकाळी ९.४० ला पोहोचून ९.४५ वाजता सुटेल. वारासिवनीला १०.१० वाजता पोहोचून १०.१२ वाजता सुटेल. कटंगीला सकाळी १०.५५ वाजता पोहोचेल. ७८८२१ गोंदिया-बालाघाट गोंदियावरून ११.४५ वाजता सुटून बालाघाटला दुपारी १.१५ ला पोहोचेल. ७८८०५ गोंदिया-कटंगी गोंदियावरून दुपारी ३.०५ वाजता सुटून बालाघाटला दुपारी ४.१० वाजता, बालाघाटवरून दुपारी ४.१५ वाजता सुटून वारासिवनीला दुपारी ४.४२ वाजता पोहोचेल. कटंगीला ही गाडी सायंकाळी ५.२५ वाजता पोहोचेल. ७८८०९ गोंदिया-बालाघाट गोंदियावरून रात्री १०.०५ वाजता सुटून रात्री ११.१० वाजता बालाघाटला पोहोचेल. गाडी ७८८१० बालाघाट-गोंदिया बालाघाटवरून रात्री ३.४० वाजता सुटून गोंदियाला पहाटे ४.४५ वाजता पोहोचेल. ७८८०२ कटंगी-गोंदिया कटंगीवरून सकाळी ७.५० वाजता सुटून वारासिवनीला ८.२३ वाजता पोहोचेल. तेथून ८.२५ वाजता सुटून बालाघाटला सकाळी ९ वाजता पोहोचेल. बालाघाटवरून ९.०५ वाजता सुटून गोंदियाला सकाळी १०.१० वाजता पोहोचेल. ७८८२२ बालाघाट-गोंदिया बालाघाटवरून दुपारी १.३० वाजता सुटून गोंदियाला २.३५ वाजता पोहोचेल. ७८८०४ कटंगी-गोंदिया कटंगीवरून सकाळी ११.१० वाजता सुटेल. ही गाडी वारासिवनीला ११.४३ वाजता पोहोचेल. वारासिवनीवरून ११.४५ वाजता सुटून बालाघाटला दुपारी १२.२० वाजता पोहोचेल. बालाघाटवरून १२.२५ वाजता सुटून गोंदियाला दुपारी १.३० वाजता पोहोचेल. ७८८०६ कटंगी-गोंदिया कटंगीवरून सायंकाळी ५.४० वाजता सुटून वारासिवनीला ६.१३ वाजता पोहोचेल. येथून सायंकाळी ६.१५ वाजता सुटून बालाघाटला ६.५० वाजता पोहोचेल. बालाघाटवरून सायंकाळी ६.५५ वाजता सुटून गोंदियाला रात्री ८ वाजता पोहोचेल. ७८८०८ बालाघाट गोंदिया रात्री ८.५० वाजता सुटून गोंदियाला ९.५५ वाजता पोहोचेल. (प्रतिनिधी)

Web Title: Changes in the schedule of DEMU trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.