‘ब्रेक दी चैन’ अंतर्गत मेट्रोच्या प्रवासी सेवांत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:08 IST2021-04-06T04:08:44+5:302021-04-06T04:08:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ६ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या ‘ब्रेक दी चैन’ टाळेबंदीमुळे महामेट्रोने आपल्या ...

‘ब्रेक दी चैन’ अंतर्गत मेट्रोच्या प्रवासी सेवांत बदल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ६ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या ‘ब्रेक दी चैन’ टाळेबंदीमुळे महामेट्रोने आपल्या प्रवासी सेवांमध्ये बदल केला आहे. त्याआनुषंगाने ऑरेंज आणि ऍक्वा लाइन मार्गिकेवर प्रवासी सेवा दर १५ मिनिटांच्या ऐवजी दर ३० मिनिटांनी सोमवार ते शुक्रवारपर्यंत उपलब्ध असतील, तर शनिवार आणि रविवारला या प्रवासी सेवा दर ३० मिनिटांच्या ऐवजी १ तासाने उपलब्ध असतील.
महा मेट्रो तर्फे ५० टक्के यात्रि क्षमता प्रमाणे ऑरेंज आणि ऍक्वा लाइन वर मेट्रो सेवा सुरु आहे. कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सुरक्षासंबंधी आवश्यक उपाययोजना प्रभावी पणे लागू आहेत. विषम परिस्थितीमध्ये प्रवासींकरिता मेट्रो परिवहन सेवा उपयुक्त असून, मेट्रोचा प्रवास सुरक्षित आहे व मेट्रो स्टेशन व ट्रेनमध्ये विशेष सतर्कता बाळगली जात आहे. प्रवासानंतर प्रत्येक वेळी आणि प्रत्येक स्टेशनला सॅनिटाईज करण्याची व्यवस्था आहे. प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावीत याकरिता त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. उपकरणांना स्पर्श कमी व्हावा याकरिता हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय बेबी केयर कक्ष, तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल कक्षाची ठराविक वेळानंतर सफाई करण्यात येत आहे.
...............