शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

आंंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन :देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:10 AM

ऑरेंज सिटी मेट्रो मॉल हा नागपूरच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. यासोबतच दक्षिण-पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासासह अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे सर्वसामान्य जनतेला जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील व त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देजागतिक दर्जाच्या ऑरेंज सिटी स्ट्रीट मॉलचे भूमिपूजनदक्षिण-पश्चिममध्ये ३७८.२५ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभमिहानच्या टॅक्सीवेच्या कामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑरेंज सिटी मेट्रो मॉल हा नागपूरच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. यासोबतच दक्षिण-पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासासह अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे सर्वसामान्य जनतेला जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील व त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.नागपूर मेट्रो व महानगरपालिकेच्या ऑरेंज सिटी मेट्रो मॉल तसेच दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी आदी सर्व आधुनिक सुविधांच्या विकास कामांचा शुभारंभ शनिवारी जयताळा येथे झाला. या विकास कामांवर ३७८.२५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. मिहानच्या टॅक्सीवेसोबत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या बांधकामांची सुरुवात लवकरच होत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.जयताळा येथील बाजार चौक येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, स्थायी समितीचे अध्यक्ष विक्की कुकरेजा, महामेट्रोचे प्रबंध संचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,‘मिहान प्रकल्पाच्या’आरक्षणातून हा भाग आता मुक्त होणार असून, येथील ७० घरांचे पुनर्वसन याच भागात करण्यात येणार आहे. टाकळीसीम येथील झोपडपट्ट्यांमधील घरे वाचविण्यासाठी येथील रस्ता ४० फुटांचा करण्यात येणार आहे. एकात्मतानगर येथील झुडपी जंगलांच्या जमिनीवरील घरांनाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मालकी हक्क पट्टेवाटप करण्याची प्रक्रिया करता येऊ शकणार आहे. मिहान प्रकल्पामध्ये आगामी काळात ३० हजार रोजगारनिर्मिती उपलब्ध होऊ शकणार आहे. सोनेगाव तलावाचा परिसर सुशोभित व विकसित करण्यासाठी १८ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, लवकरच अधिकचे १८ कोटी रुपयेही देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ऑरेंज स्ट्रीट प्रकल्पाद्वारे महापालिकेला ५०० कोटीचा महसूल उपलब्ध होणार आहे. मेट्रो मॉलसारख्या प्रकल्पांमुळे जवळपास ५ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. ब्रॉडगेज रेल्वेच्या ट्रॅकवरच आता ब्रॉडगेज मेट्रोही धावू शकणार आहे. अजनी परिसरात पॅसेंजर हब तयार करण्यात येणार आहे. शहरातील विविध मार्केट परिसरांचा नागपूर मेट्रोद्वारे विकास करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी लवकरच इलेक्ट्रीक बसमध्ये मोफत प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी प्रास्ताविक व संचालन केले. किशोर वानखेडे यांनी आभार मानले.१३ विकास कामांचे डिजिटल भूमिपूजनदक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात तब्बल १३ प्रस्तावित विविध विकास कामांचे डिजिटल भूमिपूजन यावेळी करण्यात आले. यामध्ये वर्धा रोड येथे ऑरेंज स्ट्रीट प्रकल्पांतर्गत भव्य मेट्रो मॉल, हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा रोड ५.५० कि.मी. लांबीचा सिमेंट रोड, रस्त्यांच्या डांबरीकरणासह विविध मूलभूत सुविधा, अमृत योजनेंतर्गत ११ पाण्याच्या टाक्या, ज्येष्ठ नागरिकांकरिता ७४ ठिकाणी ग्रीन जीम तयार करणे, भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे, शहरातील ११ मोठ्या उद्यानांमध्ये ओला व वाळलेला कचरा ग्रेडर मशीनद्वारे बारीक करून ऑर्र्गेनिक वेस्ट कन्व्हर्टरद्वारे कंपोस्ट खत तयार करणे, टीव्हीएस कंपनीतर्फे सीएसआर योजनेद्वारा ३३ उद्यानांमध्ये ग्रीन जीम, ज्येष्ठ नागरिकांकरिता प्रत्येक झोनमध्ये तयार करण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण, ब वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा विकास कार्यक्रमांतर्गत रेणुका माता मंदिर, यशोदा नगर परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ, टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने कार्यरत असलेले एकूण १७ आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लोकार्पण आणि फुलोरा फाऊंडेशन मुंबई निर्मित इको फ्रेण्डली अशा ७१ शौचालयांची उभाराणी. या कामांचा समावेश होता.माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही -नितीन गडकरीपरिवारातून लीडर पैदा करणे हे आपल्याला मान्य नाही. माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही, आणि मी येऊ देणारही नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे स्पष्ट केले.आम्हाला आमच्या मुलांच्या रोजागारांची अजिबात चिंता नाही. आम्हाला चिंता आहे ती केवळ बेरोजगार मुलामुलींना रोजगार कसा मिळवून देता येईल याची, असेही गडकरी म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMihanमिहान