आरक्षणात बदल, सत्तांतराचे संकेत!

By Admin | Updated: September 13, 2014 02:40 IST2014-09-13T02:40:20+5:302014-09-13T02:40:20+5:30

पंचायत समिती सभापती व उपसभापतींची रविवारी निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला महत्त्व आल्याने ...

Change in reservation, sign of power! | आरक्षणात बदल, सत्तांतराचे संकेत!

आरक्षणात बदल, सत्तांतराचे संकेत!

नागपूर : पंचायत समिती सभापती व उपसभापतींची रविवारी निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला महत्त्व आल्याने स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. घोडेबाजार वधारला असून अपक्ष व छोट्या पक्षाच्या सदस्यांना महत्त्व आले आहे.आरक्षणातील बदलामुळे काही ठिकाणी सत्ताबदल होण्याचे संकेत आहे.
अधिकाधिक पंचायत समित्यावर आपलेच सभापती निवडून यावे, यासाठी राजकीय पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यापैकी काँग्रेस, भाजप प्रत्येकी ३, शिवसेना ४ , राष्ट्रवादी काँग्रेस २ व एका ठिकाणी बसपाचा सभापती आहे. परंतु आरक्षणातील बदलामुळे यावेळी काही ठिकाणी सत्ताबदल होणार आहे.
नागपूर पंचायत समितीची सदस्य संख्या १४ आहे. परंतु वाडीच्या दोन सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आले असून एकाचा मृत्यू झाल्याने सदस्य संख्या ११ वर आली आहे. यात भाजपचे ६, काँग्रेस ४ व १ राष्ट्रवादीचा सदस्य आहे. त्यामुळे सत्तांतराची शक्यता कमी दिसते. नरखेड पं.स.मध्ये शिवसेनेचा सभापती आहे. येथील ८ सदस्यांपैकी राष्ट्रवादी ३, शिवसेना ४ व १ भाजपचा सदस्य आहे. काटोल पं.स.च्या ८ सदस्यापैकी २ पदे रिक्त आहे. ६ पैकी ४ राष्ट्रवादी तर भाजप व शेकापचा प्रत्येकी १ सदस्य आहे. कामठी येथील ८ सदस्यांत भाजप ५ तर काँग्रेसचे ३ सदस्य आहेत. हिंगणा पंचायत समितीच्या १२ सदस्यांपैकी ८ राष्ट्रवादी तर ४ भाजपचे आहेत. क ळमेश्वरात ६ पैकी काँग्रेस ४ व भाजप २, रामटेक पं.स.च्या १० सदस्यापैकी शिवसेना ४, काँग्रेस ३ तर गोगपाचे ३ सदस्य आहे. सध्या शिवसेना व गोगपाची सत्ता आहे. मौद्यात भाजप व शिवसेना यांच्यात अटीतटीचा सामना आहे. १० पैकी भाजप ४, सेना ४ तर काँग्रेस , राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ सदस्य आहे. काँग्रेस सदस्याने सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याने भाजप-सेनेत सभापतिपदासाची रस्सीखेच सुरू आहे.
पारशिवनी येथे १० पैकी ४ काँग्रेस, ३ भाजप, २ सेना व १ राष्ट्रवादी असे पक्षीय बलाबल आहे.येथे सभापतिपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.
उमरेड पं.स.च्या ६ सदस्यापैकी भाजप ३, काँग्रेस १ व बसपाचे २ सदस्य आहेत. सभापतिपद आधी अनुसूचित जातीसाठी राखीव होते. त्यामुळे बसपाचे राजकुमार लोखंडे यांना संधी मिळाली होती. आता येथील सभापतिपद महिला (खुला) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सभापतीची निवडणूक रंगतदार होणार आहे. भिवापूर पं.स.च्या ६ सदस्यापैकी काँग्रेस २ तर भाजपचे ४ सदस्य आहेत. कुही येथील ८ सदस्यापैकी काँग्रेस ४, सेना-भाजपचे प्रत्येकी २ सदस्य आहेत. सावनेर पं.स.च्या १२ सदस्यांत भाजप ५, काँग्रेस ६ व १ अपक्ष आहे. येथे भाजपचा सभापती आहे. या निवडणुकीत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Change in reservation, sign of power!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.