शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

चंद्रशेखर बावनकुळेंकडे दुसऱ्यांदा नागपूरचे पालकत्व, फडणवीसांनी पुन्हा दाखविला विश्वास

By कमलेश वानखेडे | Updated: January 18, 2025 23:36 IST

आशीष जयस्वाल यांचा गडचिरोलीत सन्मान

नागपूर: राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली. नागपूरकर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वीकारले. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवित नागपूरचे पालकत्व सोपविले. सोबतच त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्रीपदाचीही दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वत: पालकत्व घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे सह-पालकमंत्रीपद ॲड. आशीष जयस्वाल यांच्याकडे सोपवून त्यांचाही सन्मान राखला आहे. विशेष म्हणजे यामुळे जयस्वाल यांना गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनात काम करता येईल. फडणवीस, बावनकुळे व जयस्वाल यांच्या रुपात नागपूर जिल्ह्याच्या वाट्याला तीन पालकमंत्रीपदे आली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच ते गडचिरोलीचे पालकत्व घेण्यासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले होते. त्याचवेळी नागपूरची जबाबदारी बावनकुळे यांच्याकडे येईल हे स्पष्ट झाले होते. सोबतच अमरावतीची जबाबदारीही बावनकुळे यांच्याकडे सोपवून विदर्भातील सर्वात महत्वाच्या दोन्ही प्रशासकीय जिल्ह्यांचा कारभार मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासू व्यक्तिकडे सोपविला आहे.

बावनकुळे यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये नागपूसह तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली होती. बावनकुळे यांची प्रशासन सांभाळण्याची हातोटी विलक्षण आहे. त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेतील सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तीन वेळा ते विधानसभेचे आमदार आहेत. मधली दोन वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते.

भारतीय जनता पक्षाच्या पक्षीय विस्तारात बावनकुळे यांनी प्रदेशअध्यक्ष म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. ऊर्जा मंत्री म्हणून २०१४ ते २०१९ या काळात काम करत असताना, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेळघाटातील दुर्गम भागात वीज पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.

बवनकुळेंची प्रशासनावर पकड- बावनकुळे यांची प्रशासनावर पकड आहे. शुक्रवारी त्यांनी नागपूर जिल्हा परिषद व नागपूर महापालिकेचा आढावा घेतला. या बैठकीत त्याची झलक पहायला मिळाली. बावनकुळे यांचा विविध विषयांचा अभ्यास पक्का असल्यामुळे अधिकाऱ्यांनाही त्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना दहावेळा विचार करावा लागतो.

प्रक्रिया उद्योगांना चालना देणार- पालकमंत्री म्हणून नागपूर जिल्ह्यात रोजगार आणि उद्योग तसेच पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल. उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून उद्योगांना चालना देऊ. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या कृषी कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करून शेतकरी व तरुणांना ताकद देऊ. तसेच महसूल व्यवस्था मजबूत करण्यासाठी तालुकानिहाय भेटी देवू. - चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस