चंद्रकांत कुंभारे यांना दोन महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:07 IST2021-02-24T04:07:57+5:302021-02-24T04:07:57+5:30

नागपूर : प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणामध्ये चंद्रकांत गोपाळ कुंभारे (रा. सेंट्रल एव्हेन्यू) यांना दोन महिने ...

Chandrakant Kumbhare jailed for two months | चंद्रकांत कुंभारे यांना दोन महिने कारावास

चंद्रकांत कुंभारे यांना दोन महिने कारावास

नागपूर : प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणामध्ये चंद्रकांत गोपाळ कुंभारे (रा. सेंट्रल एव्हेन्यू) यांना दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच त्यांना तक्रारकर्त्याला दोन महिन्यात १ लाख ७० हजार रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश दिला व या आदेशाचे उल्लंघन केल्यास २ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे स्पष्ट केले.

सचिन जयंत आडुळकर असे तक्रारकर्त्याचे नाव असून, ते सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांनी कुंभारे यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी व्यावसायिक सेवा दिली होती. त्या सेवेकरिता कुंभारे यांनी त्यांना १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश अनादरित झाला. त्यामुळे आडुळकर यांनी या न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यात हा निर्णय देण्यात आला.

Web Title: Chandrakant Kumbhare jailed for two months