सप्तरंग क्रीडा मंडळाला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST2021-02-06T04:14:45+5:302021-02-06T04:14:45+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : रनाळा (ता. कामठी) येथील सुभाष क्रीडा मंडळाच्या वतीने पुरुषांच्या खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेचे आयाेजन ...

सप्तरंग क्रीडा मंडळाला विजेतेपद
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : रनाळा (ता. कामठी) येथील सुभाष क्रीडा मंडळाच्या वतीने पुरुषांच्या खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेतील अंतीम सामन्यात नागपूरच्या सप्तरंग क्रीडा मंडळाने नागपूरच्याच ओम अमर क्रीडा मंडळाच्या संघाला पराभूत करून विजेतेपद पटवकाले. त्यामुळे ओम अमर क्रीडा मंडळाच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
समाराेपीय कार्यक्रमात विजेत्या, उपविजेत्या संघांना, तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भाेयर व कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विजेत्या संघाला संजय गावंडे स्मृती चषक, उपविजेत्या संघाला देवेंद्र माेहाेळ यांच्या वतीने चषक प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर सुशांत मेश्राम यांच्या वतीने सप्तरंग क्रीडा मंडळाच्या तुषार गुरव याला उत्कृष्ट चढाई, वैभव मुलमुले यांच्या वतीने ओम अमर क्रीडा मंडळाच्या हर्ष देशपांडे याला उत्कृष्ट पकड, पंकज इंगाेले यांच्या वतीने ओम अमर क्रीडा मंडळाच्या अभिजीत निंबाळकर याला मॅन ऑफ द टुर्नामेंट, सुभाष क्रीडा मंडळाचे संस्थापक तथा माजी सरपंच देवराव आमधरे व प्राे कबड्डी स्पर्धेतील एकलव्य क्रीडा मंडळ नागपूरचे शशांक वानखेडे याला उत्कृष्ट कबड्डीपटू पुरस्काराने गाैरविण्यात आले.
यावेळी सुभाष क्रीडा मंडळाच्या राजू इंगाेले यांचाही गाैरव करण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी रवी गावंडे, सुभाष आमधरे, मधुकर गिरी, सतीश नवले, सुनील चलपे, अमोल मोहोळ, शुभम नवले, बाबा ठाकरे, बादल गिरी, वैभव मुलमुले, सूरज गिरी, अनुप अढाऊ, हुकुमचंद ढोरे, राजू इंगोले, मंगेश मुलमुले, संजय मेंढे, महेश इंगोले, उमेश गिरी, उमेश पोचपोंगले, संदेश लोणारे, रोशन नवले, रजत गिरी, दिगांत गणेर, पंकज इंगोले, रणजीत लोणारे, लोडबा ठाकरे, अभिषेक नवले, मयूर गणेर, रितिक गावंडे, नयन चलपे, कुणाल गावंडे, अंकित नागपुरे, नाना बावणे, शुभम भडंग, शुभम मते, आदित्य मोहोळ, आदित्य पोचपोंगळे, प्रेम गिरी, गौरव बडोदिया, अंश बडेल, आर्यन राऊत, तारुण्य इंगोले, आकाश परतेकी यांनी सहकार्य केले.