शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सदर उड्डाणपुलावर चमकोगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 21:54 IST

सदरमधील उड्डाण पूल पूर्ण झाल्याचे दिसून येत असले तरी अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. शुक्रवारी काही उपद्रवींनी पूल वाहतुकीसाठी खुला करीत चमकोगिरी केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या उपद्रवींना ताब्यात घेतले आणि पूल पुन्हा बंद केला.

ठळक मुद्देउपद्रवींकडून पूल बळजबरीने सुरू करण्याचा प्रयत्नपुलाचे काम अजूनही अपूर्ण,अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदरमधील उड्डाण पूल पूर्ण झाल्याचे दिसून येत असले तरी अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे होईल. परंतु काही उपद्रवींना याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. शुक्रवारी काही उपद्रवींनी पूल वाहतुकीसाठी खुला करीत चमकोगिरी केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या उपद्रवींना ताब्यात घेतले आणि पूल पुन्हा बंद केला.सदर येथील हा नवनिर्मित पूल वाहतूक व्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. हा पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु वाहतुकीसाठी मात्र तो अजूनही तयार नाही. एनएचएआयचे महाव्यवस्थापक नरेश वडेट्टवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काम केले जात आहे. मार्किंग, पेंटिंग केली जात आहे. सहा ते सात दिवसात काम पूर्ण होईल. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. परंतु काही उपद्रवींना याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. ते शुक्रवारी दुपारी पूल वाहतुकसाठी खुला करण्यासाठी पोहोचले. ते स्वत:ला काँग्रेसचे कार्यकर्ता असल्याचे सांगत त्यांनी पुलावरील बॅरिकेट हटवून खुला केला. वाहन चालकांना पुलावरून जाण्यास सांगितले. अनेक वाहन चालकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुलावर वाहन घेऊन गेले. कुठलीही अप्रिय घटना घडली नाही म्हणून ठीक झाले. एखादा अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती. याचा विचारही या उपद्रवींनी केला नाही. यातही या उपद्रवींनी येथे एक बोर्ड लावला. यात एका संस्थेला उड्डाण पुलाच्या बांधकामाचे श्रेय देण्यात आले आहे.पक्षाचा काहीही संबंध नाहीज्या काँग्रेस पक्षाचे नाव घेऊन या उपद्रवींनी पूल सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्या पक्षाचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मात्र पक्षाशी त्यांचे काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, ही केंद्र सरकारची योजना आहे. त्यांनी एनएचआयकडे पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. काही टिंगल टवाळी करणाऱ्या लोकांनी पक्षाच्या नावावर पूल उघडण्याचा प्रयत्न केला.काम पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक शक्य नाहीसदर उड्डाण पुलाच्या कामात आठ महिन्याचा उशीर झाला आहे. २ जानेवारी रोजी याचे लोकार्पण होणार होते. परंतु काम अपूर्ण असल्याचे ते शक्य झाले नाही. पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय पुलावरून वाहतूक सुरु केली जाऊ शकत नाही, असे एनएचएआयचे महाव्यवस्थापक नरेश वडेट्टवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर