शहरं
Join us  
Trending Stories
1
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
3
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
4
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
5
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
6
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
7
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
8
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
9
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
10
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
11
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
12
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
13
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
14
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
15
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
16
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
17
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
18
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
19
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
20
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार्य करावे : नितीन गडकरी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:09 IST

देशात नागपूरचा विकास वेगाने होत आहे. त्या प्रमाणात व्यापारी आणि उद्योजकांचा विकास महत्त्वाचा आहे. अनेक योजनांमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग असावा, असे शासनाचे मत आहे. त्याकरिता केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

ठळक मुद्देएनव्हीसीसीचा अमृत महोत्सवी कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात नागपूरचा विकास वेगाने होत आहे. त्या प्रमाणात व्यापारी आणि उद्योजकांचा विकास महत्त्वाचा आहे. अनेक योजनांमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग असावा, असे शासनाचे मत आहे. त्याकरिता केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.नाग विदर्भ ऑफ चेंबरतर्फे (एनव्हीसीसी) अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी हॉटेल तुली इम्पेरियलमध्ये करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानाहून गडकरी बोलत होते. व्यासपीठावर खा. कृपाल तुमाने, महापौर नंदा जिचकार, चेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी, सचिव अ‍ॅड. संजय अग्रवाल, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश मेहाडिया आणि संयोजक सीए बी.सी. भरतीया उपस्थित होते. यावेळी लोकमत समूहाचे बिझनेस एडिटर सोपान पांढरीपांडे यांचा सत्कार करण्यात आला.चेंबरने देशातील संघटनांप्रमाणे कार्य करावेगडकरी म्हणाले, चेंबरला ७५ वर्षे पूर्ण झाली असून नागपूरची क्षमता पाहून पुढील २५ वर्षांचे व्हिजन डाक्युमेंट तयार करावे. फिक्की, सीआयआय संघटनेप्रमाणे काम करावे. त्यांच्या सहकार्याने नागपुरात सक्षम व्यापारी बाजारपेठा उभ्या राहतील. चेंबरने व्यापाऱ्यांच्या कर समस्या, अडचणी सोडविण्यासोबतच व्यापाऱ्यांचा विकास कसा होईल, याकडे लक्ष द्यावे. शहरातील सुविधांचा लाभ व्यापाऱ्यांना मिळवून द्यावा. त्याकरिता केंद्र आणि राज्य शासन चेंबरच्या पाठिशी आहे. इतवारी, शहीद चौक, मस्कासाथ येथील व्यापाऱ्यांना नवीन मार्केटमध्ये सुविधायुक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बुधवार बाजार आणि सक्करदरा बाजाराचे डिझाईन तयार आहे. व्यावसायिक मार्केट तयार होणार आहे. हरिहर मंदिरजवळ नवीन मार्केट तयार होत आहे. या सर्वांचा व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.देशात नागपूरचा विकास वेगातनागपूरच्या विकासावर बोलताना गडकरी म्हणाले, नागपूर विमानतळ जीएमआरला हस्तांतरित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल. त्यामुळे नागपूर जगाशी जोडले जाईल आणि विमानतळाची कार्गो आणि पॅसेंजर हबची संकल्पना पूर्णत्वास येईल. मिहानमध्ये दोन हजार एकरवर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. डिझाईन तयार आहे. सेंटरमध्ये वर्षभर प्रदर्शने होतील. त्यामुळे व्यवसाय वाढेल आणि व्यापाराला गती मिळेल. अजनी स्टेशनजवळ मल्टीमॉडेल हब तयार करण्यात येत आहे. त्याकरिता केंद्राने ८०० कोटी मंजूर केले आहे.रेल्वे, फूड कॉर्पोरेशन आणि कारागृृहाची जागा घेण्यात येणार आहे. गडकरी म्हणाले, हिंगणा आणि बुटीबोरी एमआयडीसीमध्ये नवीन युनिट येत आहेत. वर्ल्ड बँकेतर्फे लो हाऊसिंग प्रकल्प आणि केएफडब्ल्यू बँकेतर्फे एमआयडीसीमध्ये सोलर रुफ टॉप लावण्याची योजना आहे. मिहानमध्ये एचसीएल कंपनी विस्तारीकरणात आणखी १० हजार युवकांना रोजगार देणार आहे. सोलर चरखा क्लस्टरसाठी केंद्र १० कोटी देणार आहे. लॉजिस्टिक पार्क संकल्पनेत फ्युचर ग्रुप मुख्य कार्यालय मिहानमध्ये आणत आहे. त्यामुळे १० हजार युवकांना रोजगार मिळेल. शहारात मोठी गुंतवणूक करणाऱ्यांचा सत्कार करावा. त्यामुळे व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील, असे गडकरी म्हणाले.लघु उद्योजकांना ४५ दिवसांत त्यांच्या मालाचे पैसे मिळत नाहीत. त्यांच्यासाठी समाधान पोर्टल सुरू करण्यात आले. त्यांना वेळेत पैसा मिळेल. अलीबाबा व अ‍ॅमॅझॉन एका वेबसाईटवर येऊन लघु उद्योगांसाठी जॉईंट व्हेंचर तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे १० हजार कोटींचा व्यवसाय होईल.प्रारंभी हेमंत गांधी यांनी चेंबरच्या कार्याची माहिती दिली. बी.सी. भरतीया यांनी व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर कशी मात करायची, यावर मार्गदर्शन केले. यावेळी चेंबरच्या ७५ वर्षांचा इतिहास असलेल्या ‘अमृतपुष्प’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. चेंबरचे उपाध्यक्ष फारुख अकबानी यांनी आभार मानले. कार्यक्रमात चेंबरचे कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, उपाध्यक्ष अश्विन मेहाडिया, चेंबरचे माजी अध्यक्ष, सहसचिव स्वप्निल अहिरकर, अनिल अहिरकर, माजी आ. रमेश बंग, गिरीश गांधी, तेजिंदरसिंग रेणू, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नगरसेविका प्रगती पाटील, चेंबरचे सर्व पदाधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर