शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलवरील कारवाई रद्द करण्याच्या आदेशाला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 1:45 AM

मानकापूर चौकातील अ‍ॅलेक्सिस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवरील कारवाई रद्द करण्याच्या आदेशाविरुद्ध महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका ऐकल्यानंतर पुढील निर्देशापर्यंत या प्रकरणात वर्तमान परिस्थिती कायम ठेवण्यास सांगितले. तसेच, अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलला नोटीस बजावून सहा आठवड्यात उत्तर मागितले.

ठळक मुद्दे मनपाची सर्वोच्च न्यायालयात याचिका : वर्तमान परिस्थिती कायम ठेवण्यास सांगितले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मानकापूर चौकातील अ‍ॅलेक्सिस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवरील कारवाई रद्द करण्याच्या आदेशाविरुद्ध महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका ऐकल्यानंतर पुढील निर्देशापर्यंत या प्रकरणात वर्तमान परिस्थिती कायम ठेवण्यास सांगितले. तसेच, अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलला नोटीस बजावून सहा आठवड्यात उत्तर  मागितले.याचिकेवर न्या. रोहिंटन फली नरिमन, न्या. नवीन सिन्हा व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. महानगरपालिकेने अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलमधील जेनेटिक क्लिनिकची नोंदणी रद्द करून तेथील ८ वैद्यकीय यंत्रे जप्त केली होती.  त्याविरुद्ध अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. गेल्या २४ जुलै रोजी उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर करून अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलवरील संपूर्ण कारवाई रद्द केली आणि जेनेटिक क्लिनिकची नोंदणी कायम ठेवून जप्तीमधील सर्व वैद्यकीय उपकरणे तातडीने मुक्त करण्याचा आदेश दिला. तसेच, सदर आदेशाचे त्याच दिवशी पालन करण्यात अपयश आल्यास पुढील प्रत्येक दिवशी रोज ५० हजार रुपये खर्च द्यावा लागेल असे मनपाला बजावले. याशिवाय महानगरपालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार व तज्ज्ञांच्या सल्लागार समितीवर तीक्ष्ण ताशेरे ओढले. कारवाईत कुठेही पारदर्शकता ठेवण्यात आली नाही व कायद्याचे पालन करण्यात आले नाही असे निरीक्षण नोंदवले. मनपाचा त्यावर आक्षेप आहे.असा आहे घटनाक्रम२० जून २०२० रोजी हेमवती तिवारी या महिलेने अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलच्या जेनेटिक क्लिनिकमध्ये गैरप्रकार होत असल्याची डॉ. गंटावार यांच्याकडे तक्रार केली. २२ जून २०२० रोजी हेमवती तिवारी यांना २डी इको कार्डिओग्राम चाचणी करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर डॉ. गंटावार यांनी लगेच रुग्णालयात पोहचून तिवारी यांची अपात्र डॉक्टरद्वारे तपासणी करण्यात आल्याचा आरोप केला. ४ जुलै २०२० रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावली. ७ जुलै २०२० रोजी हॉस्पिटलने कारणे दाखवा नोटीसला उत्तर देऊन कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसाचा वेळ मागितला. ८ जुलै २०२० रोजी हॉस्पिटलवर संबंधित कारवाई करण्यात आली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhospitalहॉस्पिटल