शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:58 IST

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना मराठा आरक्षण लागू करण्याबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव तसेच ‘सीईटी सेल’ला नोटीस बजावली आहे. १० जूनपर्यंत उत्तर सादर करण्यात यावे, असे खंडपीठाने निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देमहाधिवक्ता, प्रधान सचिव, सीईटी सेलला नोटीस : १० जूनपर्यंत मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना मराठा आरक्षण लागू करण्याबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव तसेच ‘सीईटी सेल’ला नोटीस बजावली आहे. १० जूनपर्यंत उत्तर सादर करण्यात यावे, असे खंडपीठाने निर्देश दिले आहेत.पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना यंदा मराठा आरक्षण लागू होणार नसल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर न्यायालयीन निर्णयांना डावलून राज्य शासनाने ‘एसईबीसी’ कायद्यातील कलम १६ (२) मध्ये दुरुस्ती करणारा अध्यादेश काढला. तसेच मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू केले. यानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमातील १६ टक्क्यांवर झालेले प्रवेश कायम ठेवण्यात आले होते. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशप्रक्रिया ३१ मे पर्यंत पूर्ण होणार आहे.या अध्यादेशाविरोधात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयातच याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयातील न्या.अरुण मिश्रा, न्या.भूषण गवई व न्या.सूर्यकांत यांच्या पूर्णपीठाने सदर याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवारी अवकाशकालीन न्या.श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने अध्यादेशाच्या वैधतेसंदर्भात राज्याच्या महाधिवक्त्यांना नोटीस बजावली. या अध्यादेशानुसार होणारे सर्व प्रवेश याचिकेच्या निकालाच्या अधीन ठेवण्यात यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना अ‍ॅड. अश्विन देशपांडे यांनी केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMaratha Reservationमराठा आरक्षणMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थी