शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘आंतरराष्ट्रीय’ तोगडियांसमोर विदर्भात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 10:17 IST

विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या नव्या संघटनेची घोषणा केली. संघटनेला तोगडिया यांनी जरी ‘आंतरराष्ट्रीय’ नाव दिले असले तरी, प्रत्यक्षात कार्यप्रणाली ही जवळपास ‘विहिंप’सारखीच राहणार आहे.

ठळक मुद्दे‘विहिंप’प्रमाणेच राहणार आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची कार्यप्रणालीनव्या पदाधिकाऱ्यांना जोडण्याचे ‘टार्गेट’

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या नव्या संघटनेची घोषणा केली. संघटनेला तोगडिया यांनी जरी ‘आंतरराष्ट्रीय’ नाव दिले असले तरी, प्रत्यक्षात कार्यप्रणाली ही जवळपास ‘विहिंप’सारखीच राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या विदर्भातील नवीन लोकांना जोडणे व संघटनेचे वेगळेपण सिद्ध करण्याचे मोठे आव्हान तोगडियांच्या समर्थकांसमोर राहणार आहे. विशेष म्हणजे, ‘विहिंप’मधून आलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांसमवेत नवीन लोकांनादेखील जबाबदारी देण्याची संघटनेची भूमिका असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.दिल्ली येथे रविवारी झालेल्या बैठकीला विदर्भातून सुमारे ७० ते ८० कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. ‘विहिंप’मधून राजीनामे देऊन हे सर्व जण तोगडिया यांच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. विदर्भातील संघटनेचे नेमके स्वरूप हे जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत ठरविण्यात येईल. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संघटनमंत्री महावीर हे यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.‘विहिंप’मध्ये असताना डॉ. प्रवीण तोगडिया यांचे नागपुरात नियमित दौरे व्हायचे व ते येथील कार्यकर्ते-पदाधिकाºयांच्या संपर्कात असायचे. त्यांच्याकडे पाहून अनेक तरुण विहिंपच्या कार्यात सहभागी झाले. विहिंप म्हणजे तोगडिया असे समीकरण तयार झाले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जाहीर टीका केल्यानंतर तोगडियांबाबत संघ परिवारात नाराजीचा सूर निर्माण झाला होता. ‘विहिंप’च्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकांत तोगडिया यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी ‘विहिंप’ला ‘रामराम’ केला.

‘विहिंप’चे कार्यकर्ते जोडण्यावर भरतोगडियांच्या समर्थनार्थ विदर्भ व नागपुरातूनदेखील अनेक कार्यकर्त्यांनी तसेच पाऊल उचलले. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद स्थापन झाल्यानंतर संघटन मजबुतीसाठी कार्यकर्ते जोडावे लागणार आहेत. यासाठी सर्वात अगोदर तर ‘विहिंप’, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाच जोडण्याचा प्रयत्न करण्यात येण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तरुणांना संघटनेत आणण्यावर भरविदर्भात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेसमोर अनेक आव्हाने राहणार आहेत. नवीन संघटना असल्यामुळे सर्वात अगोदर नवीन लोक जोडावे लागणार आहेत. तोगडिया यांना मानणारे अनेक तरुण विदर्भ व नागपुरात आहेत. संघटनेच्या भूमिकेनुसार नव्या तरुणांना जोडण्यावर भर देण्यात येणार आहे. जुन्या कार्यकर्त्यांसोबतच त्यांनादेखील संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे आंतरराष्ट्रीय हिंदू संघटनेचे पदाधिकारी राजेश शुक्ला यांनी सांगितले.

‘विहिंप’चा दावा, संघटना मजबूतयासंदर्भात ‘विहिंप’चे पदाधिकारी अधिकृतरीत्या बोलण्यास तयार नाहीत. मात्र एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने गोपनीयेतच्या अटीवर तोगडिया यांच्या संघटनेला आम्ही गंभीरतेने घेत नसल्याचे सांगितले. ‘विहिंप’चे पदाधिकारी आपल्या कार्यात व्यस्त आहेत व कुणीही संघटना सोडून जाणार नाहीत. आतापर्यंत जे गेले त्यात महत्त्वाचे कुणीही पदाधिकारी नव्हते. विदर्भात ‘विहिंप’ मजबूत आहे, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडिया