नवीन अध्यक्षांपुढे निवडणुकीचे आव्हान!
By Admin | Updated: March 2, 2016 03:17 IST2016-03-02T03:17:44+5:302016-03-02T03:17:44+5:30
२०१७ मध्ये होत असलेल्या महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी भाजपला गेल्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागणार आहे.

नवीन अध्यक्षांपुढे निवडणुकीचे आव्हान!
स्थायी समिती अध्यक्षांची शुक्रवारी निवड : बंडू राऊत स्वीकारणार पदभार
नागपूर : २०१७ मध्ये होत असलेल्या महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी भाजपला गेल्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागणार आहे. यात स्थायी समितीची भूमिका महत्त्वाची असल्याने समितीचे नवीन अध्यक्ष बंडू राऊ त यांना निवडणुकीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांचा कार्यकाळ शुक्रवारी संपत आहे. त्याच दिवशी राऊ त अध्यक्षदाची सूत्रे स्वीकारणार आहे. यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. आजवर स्थायी समिती अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला जात होता. परंतु यावेळी ४ मार्चला अध्यक्षपदाची निवडणूक असून त्याच दिवशी नवीन अध्यक्षांचा पदग्रहण समारंभ होत आहे.
महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना गेल्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे शहरातील विकास कामे डिसेंबर पूर्वी करावी लागतील. यासाठी ३१ मार्चपूर्वी २०१६-१७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. या दृष्टीने पदाधिकारी व प्रशासन कामाला लागले आहे.
अनधिकृत ले-आऊ टमधील विकास कामे, शहरातील रस्ते, सिव्हरलाईन, पथदिवे अशा विकास कामांसाठी नगरसेवकांचा आग्रह राहणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने गेल्या वर्षात स्थायी समितीच्या मंजुरीनंतरही अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. निधीच्या उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रमाने कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे निधी पळवापळवीचे प्रकार वाढणार आहेत. वजनदार नगरसेवकांच्या प्रभागातील कामे तातडीने मार्गी लागतात तर वजन नसलेल्यांना फाईल्स घेऊ न फिरावे लागणार आहे. विकास निधीसाठी चांगलीच रस्सीखेच होणार आहे. (प्रतिनिधी)