देवाला नमस्कार करून केले चौर्यकर्म
By Admin | Updated: October 6, 2015 03:45 IST2015-10-06T03:45:30+5:302015-10-06T03:45:30+5:30
देवाला आधी नमस्कार करून चोरट्याने नंतर चौर्यकर्म केले. शहरातील आग्याराम देवी मंदिराजवळच्या दुकानात घडलेली

देवाला नमस्कार करून केले चौर्यकर्म
नागपूर : देवाला आधी नमस्कार करून चोरट्याने नंतर चौर्यकर्म केले. शहरातील आग्याराम देवी मंदिराजवळच्या दुकानात घडलेली ही अफलातून घटना सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाली आहे.
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आग्याराम देवी मंदिर चौकाजवळ खादी ग्रामोद्योग आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास येथे चोरट्यांची एक टोळी पोहचली. आधी देवाला नमस्कार केला. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी शटरसमोर पडदा धरला. पडद्याआड असलेल्या (देवदर्शन करणाऱ्या) चोराने शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यातील रक्कम काढली आणि नंतर बाहेर आला. इप्सित साध्य झाल्याचा त्याने इशारा करताच चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. विशेष म्हणजे, ज्याने आधी देवदर्शन करून नंतर चोरी केली. त्याने आपल्या साथीदारांशीही दगाबाजी केली. गल्ल्यातील चोरलेल्या एकूण रक्कमेपैकी काही रक्कम त्याने आधीच स्वत:च्या अंतर्वस्त्रात कोंबली. तर काही रक्कमच बाहेर पडल्यानंतर चोरट्या साथीदारांच्या हातात ठेवली. सीसीटीव्ही फुटेजवरून हे सर्व उघड झाले. (प्रतिनिधी)