लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस 'अवतार दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय मंगळवारी महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने चर्चा केल्यावर सामान्य प्रशासन विभागामार्फत परिपत्रक जारी केले आहे. चक्रधर स्वामी यांचा 'अवतार दिन' साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. परंतु त्यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करण्यात आला होता.
स्वामी अवतार पुरुष असल्याने अवतार दिनाबाबत स्वतंत्र परिपत्रक जारी करण्याची मागणी महानुभाव पंथाच्या नागपूर अधिवेशनात करण्यात आली होती. अशी माहिती मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिली. परिपत्रकानुसार, मंत्रालयासह सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये 'अवतार दिन' म्हणून साजरा केला जाईल.
विश्वाला प्रेरणा देणारा वारसाश्रीचक्रधर स्वामींचे तत्त्वज्ञान आणि कार्य कायम प्रेरणा देणारे आहे. त्यांचे कार्य विश्वाला प्रेरणा देणारा वारसा आहे. 'अवतार दिन' साजरा करण्याचा निर्णय केवळ एक उत्सव नसून, सत्य व मानवतेच्या मूल्यांचा जागर करण्याचा संकल्प आहे.चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री