एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला

By Admin | Updated: August 28, 2014 02:07 IST2014-08-28T02:07:59+5:302014-08-28T02:07:59+5:30

१७ वर्षीय मुलीकडून प्रेमाला दाद न मिळाल्यामुळे एका तरुणाने तिच्यावर चाकूहल्ला केला. आज दुपारी १२.१० च्या सुमारास नंदनवन कॉलनीत ही थरारक घटना घडली.

Chakahala from one love | एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला

एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला

नंदनवनमधील घटना : परिसरात खळबळ
नागपूर : १७ वर्षीय मुलीकडून प्रेमाला दाद न मिळाल्यामुळे एका तरुणाने तिच्यावर चाकूहल्ला केला. आज दुपारी १२.१० च्या सुमारास नंदनवन कॉलनीत ही थरारक घटना घडली.
अरुण फुलझेले (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. तो जगनाडे चौकाजवळ राहातो. नंदनवनमधील एका अल्पवयीन मुलीवर (वय १७) त्याचे एकतर्फी प्रेम आहे. त्यासाठी तो तिचा नेहमीच पाठलाग करतो. आज दुपारी ती मुलगी नंदनवन कॉलनीतून जात असताना आरोपी फुलझेलेने तिला थांबवले. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्या जावयासोबत बोल’, असे म्हणत त्याने आपला मोबाईल तिच्या हातात दिला. वारंवार त्याचा त्रास होत असल्यामुळे मुलीने मोबाईलवर आरोपीच्या जावयाला हा प्रकार सांगितला. ती आपल्या जावयाकडे तक्रार करीत असल्याचे ऐकून आरोपी फुलझेले संतापला. त्याने तिच्या मानेवर चाकूने वार केला. ती गंभीर जखमी झाल्यामुळे आरडाओरड करू लागली. ते ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेला. (प्रतिनिधी)

Web Title: Chakahala from one love