राऊ त होणार स्थायी समितीचे अध्यक्ष!
By Admin | Updated: February 11, 2016 03:30 IST2016-02-11T03:30:01+5:302016-02-11T03:30:01+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी परिवहन समितीचे सभापती सुधीर राऊ त यांची निवड केली जाणार आहे.

राऊ त होणार स्थायी समितीचे अध्यक्ष!
शुक्रवारी घोषणा : भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत होणार निर्णय
नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी परिवहन समितीचे सभापती सुधीर राऊ त यांची निवड केली जाणार आहे. शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु भाजपमध्ये ऐनवेळी नावात बदल होण्याची परंपरा सुरू झाल्याने घोषणा झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीत महापौर प्रवीण दटके यांचे नाव निश्चित मानले जात होते. परंतु ऐनवेळी गिरीश व्यास यांना पक्षाची उमेदवारी देण्यात आली. तसेच आमदार कृष्णा खोपडे शहर अध्यक्षपदी कायम राहतील अशी चर्चा होती. परंतु आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. विशेष सभेनंतर बुधवारी दटके यांना स्थायी समिती अध्यक्षासंदर्भात विचारले असता याबाबतचा निर्णय कोर कमिटी घेणार असल्याचे सांगून त्यांनी माहिती देण्याचे टाळले. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नगरसेवक सुनील अग्रवाल, गिरीश देशमुख व नीता ठाकरे हेही इच्छूक आहे. सुनील अग्रवाल यांचे नाव सत्तापक्षनेतेपदासाठी निश्चित झाले होते. परंतु ऐनवेळी दयाशंकर तिवारी यांचे नाव पुढे आले होते. त्यामुळे अग्रवाल यांची समजूत काढण्यासाठी त्यांना स्थापत्य समितीचे सभापतिपद तर गिरीश देशमुख यांना कर संकलन समितीचे लागोपाठ दुसऱ्यांदा सभापती करण्यात आले. गेल्यावेळी नीता ठाकरे यांचे नाव स्थायी समिती अध्यक्षपदासाठी होते. परंतु त्यांना सदस्यपदावर समाधान मानावे लागले. (प्रतिनिधी)