उपाध्यक्षाच्या खुर्चीला ‘नाट’

By Admin | Updated: October 10, 2016 02:35 IST2016-10-10T02:35:19+5:302016-10-10T02:35:19+5:30

जिल्हा परिषदेत उपाध्यक्षांचा मान मोठा असला तरी, हे पद मात्र अनेकांसाठी धोकादायक ठरले आहे. जि.प.मध्ये

The chair of the vice chancellor | उपाध्यक्षाच्या खुर्चीला ‘नाट’

उपाध्यक्षाच्या खुर्चीला ‘नाट’

अनेकांचे पुढचे राजकारण धोक्यात : आरक्षणाने नाडले
मंगेश व्यवहारे ल्ल नागपूर
जिल्हा परिषदेत उपाध्यक्षांचा मान मोठा असला तरी, हे पद मात्र अनेकांसाठी धोकादायक ठरले आहे. जि.प.मध्ये ज्यांनी उपाध्यक्ष पदाचा मान पटकाविला, त्यांचे पुढचे राजकारणच धोक्यात आले आहे. एकाचा सर्कलच राहला नाही. तर दुसऱ्याला आपला सर्कल गमवावा लागला.
२०१२ ते २०१७ या कालावधीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर चिखले व शिवसेनेचे शरद डोणेकर यांना उपाध्यक्षाची संधी लाभली. शरद डोणेकर हे कन्हान-पिपरी सर्कलमधून निवडून आले होते. मात्र कन्हान नगर परिषद झाल्याने नव्या रचनेत त्यांचा सर्कलच राहिला नाही तर चंद्रशेखर चिखले यांचा मेटपांजरा सर्कल हा सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाल्याने या दोघांचीही सर्कल शोधात धावपळ होत आहे.
अडीच दशकापासून ही परंपरा कायम आहे. जि.प.चे अध्यक्षपद लाभलेले सदस्य आमदारकीपर्यंत पोहचले. परंतु बहुतांश उपाध्यक्षांना पायउतारच व्हावे लागले. यातील काही उपाध्यक्ष राजकारणातून लुप्त होत आहे. सदानंद निमकर हे १९९७ पर्यंत उपाध्यक्ष होते. नंतर ते जि.प.मधूनच गायब झाले. राष्ट्रवादीचे बंडोपंत उमरकर हे दोन वर्ष उपाध्यक्ष राहिले. त्यानंतर ते सदस्य म्हणून निवडणुन आले. परंतु पदापासून वंचित राहिले. अखेर त्यांचे सर्कल आरक्षित झाले.
२०१२ पासून ते जिल्हा परिषद बाहेर आहे. १९९८-९९ मध्ये उपाध्यक्ष असलेले चरणसिंग ठाकूर यांना जि.प. मधून नगर परिषदेमध्ये जावे लागले. २००२ ते २००५ या कालावधीत उपाध्यक्ष असलेले शेषराव रहाटे हे परत जि.प. दिसले नाही.
ज्ञानेश्वर साठवणे उपाध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांची हत्या झाली. २००७ ते ०९ दरम्यान उपाध्यक्ष असलेले तापेश्वर वैद्य यांना २०१२ च्या निवडणुकीत मात खावी लागली. राष्ट्रवादीचे नितीन राठी यांनी उपाध्यक्ष असताना अनेक चांगले काम केले. परंतु त्यांनाही २०१२ च्या निवडणुकीत आरक्षणाचा फटका बसला. आणि या टर्मच्या आजी-माजी उपाध्यक्षांना आपले सर्कल गमवावे लागले.

रमेश मानकर अपवाद
१९९९ ते २००२ मध्ये रमेश मानकर हे जि.प. चे उपाध्यक्ष होते. त्यांच्यासाठी हे पद प्रगतीचे ठरले. त्यांना पुढे अध्यक्ष म्हणून बढतीही मिळाली. परंतु २०१२ मध्ये त्यांचे सर्कल महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनाही जि.प.चा नाद सोडावा लागला.

Web Title: The chair of the vice chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.