देशपांडे सभागृहातील खुर्च्या तुटल्या

By Admin | Updated: September 2, 2014 01:11 IST2014-09-02T01:11:12+5:302014-09-02T01:11:12+5:30

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह हे नागपूर शहरातील प्रमुख व सद्यपस्थितीतील सर्वात मोठे सभागृह आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचा मेळाव्यापासून तर कॉलेजच्या गॅदरिंगपर्यंत आणि पुस्तक प्रकाशनापासून तर

Chair breaks in the Deshpande hall | देशपांडे सभागृहातील खुर्च्या तुटल्या

देशपांडे सभागृहातील खुर्च्या तुटल्या

बकाल व्यवस्था : आयोजकांची लुबाडणूक, प्रेक्षकांना त्रास
नागपूर : डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह हे नागपूर शहरातील प्रमुख व सद्यपस्थितीतील सर्वात मोठे सभागृह आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचा मेळाव्यापासून तर कॉलेजच्या गॅदरिंगपर्यंत आणि पुस्तक प्रकाशनापासून तर नाटकांपर्यंत सर्वांसाठी या सभागृहाची मागणी असते. परंतु मागील काही दिवसांपासून या सभागृहाची दयनीय अवस्था झाली आहे. आसनव्यवस्था बकाल झाली असून, प्रत्येक रांगेत तुटलेली खुर्ची आढळून येते. अशापरिस्थितीत आयोजकांची लुबाडणूक सुरू असून, त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात १०१३ प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था आहे. बसण्याची व्यवस्था तीन विभागात करण्यात आली आहे. सुरुवातीच्या दोन ते तीन रांगा या व्हीआयपी व व्हीव्हीआयपींसाठी तसेच पत्रकारांसाठी राखीव असते.
शहरातील सर्वात मोठे सभागृह असल्याने येथे राजकीय पक्षांचे मेळावे, पुस्तक प्रकाशन, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, व्याख्यान आणि नाटकांसह सर्वच प्रकारचे कार्यक्रम होतात. मोठे सभागृह असल्याने त्याचे भाडेसुद्धा अधिक आहे. देशपांडे सभागृहाचे तीन तासासाठीचे भाडे ११,३०० रुपये आहे.
तीन-तीन तासाचे चार स्लॉट आकारण्यात आले आहे. आयोजकांकडून पूर्ण पैसे आकारले जातात. परंतु आसनाच्या बकाल व्यवस्थेमुळे प्रेक्षक नागरिकांनाच चांगलाच त्रास सहन करावा लागतो.
प्रत्येक रांगेत तुटलेली खुर्ची आहे. तसेच बहुतांश खुर्च्या या जीर्ण झाल्या असून तुटण्याच्या मार्गावर आहेत. अशास्थितीत नागरिकांनी बसावे कुठे, हा प्रश्न आहे. गर्दी वाढली तर अतिरिक्त खुर्च्या मागवाव्या लागतात. अशावेळी आयोजकांची एकप्रकारे लुबाडणूक होत आहे. (प्रतिनिधी)
खुर्च्यांमध्ये घोटाळा,
११,८०० रुपयाला एक खुर्ची
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात गेल्यावर्षीच नूतनीकरण करण्यात आले होते. तेव्हा तब्बल ४०० खुर्च्या बसविण्यात आल्या. एक खुर्ची तब्बल ११,८०० रुपयाला बसविण्यात आली असून, यात प्रचंड घोटाळा करण्यात आला आहे. जनमंचने ही बाब उघडकीस आणली असून, सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा नोंदविली आहे. जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार देशपांडे सभागृहातील खुर्च्या तुटलेल्या आहेत. यासंबंधात माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली तेव्हा ४०० खुर्च्या बसविण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु यातही घोटाळा करण्यात आला. एक खुर्ची ६२०० रुपयाला बसविण्यात आली असतानाही शासनाकडून मात्र प्रत्येक खुर्चीसाठी ११,८०० रुपये वसूल करण्यात आले आहे. २२ लाख ४० हजार रुपयाची शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. यातही केवळ १५० खुर्च्याच लावण्यात आलेल्या आहेत. हा घोटाळा अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला असून, जनमंचने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कारवाई करण्यात आलेली नाही. दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे प्रमोद पांडे यांनी सांगितले.
पावणेदोनशेवर खुर्च्या निकामी
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहातील जवळपास १७५ पेक्षा अधिक खुर्च्या तुटलेल्या आहेत. यापैकी काही खुर्च्या तर गायब आहेत. सभागृहातील आसनव्यवस्था तीनस्तरीय आहे. पहिल्या स्तरातील तिसऱ्या व सहाव्या रांगेतील ३ नंबरच्या दोन खुर्र्च्या तुटलेल्या आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरील खुर्च्यांची सर्वाधिक दयनीय अवस्था आहे. दुसऱ्या सत्रातील पहिल्या रांगेतील १५, २६, २८, २९, ३०, ३२, २०, १८, १९, १२ क्रमांकाच्या खुर्च्या तुटलेल्या आहेत. सहाव्या रांगेतील ९, ११, २ क्रमांकाची, पाचव्या रांगेतील ५, १६, १६, १९ क्रमांकाच्या खुर्च्या तुटलेल्या आहेत. सातव्या रांगेतील ८ व्या क्रमांकाची, १२ व्या रांगेतील १५, १६, १३, २० क्रमांकाच्या खुर्च्या, ११ व्या रांगेतील १४, १३, १०, १, २, २६, २७, २८, २० क्रमांकाच्या खुर्च्या, १० व्या रांगेतील १४, १२, १०, ८, १२, ३५, ३६, ३०, २२, २६, २८, २९ क्रमांकाच्या खुर्च्या आणि नवव्या रांगेतील २५, २६, २१, ३४, ३५, ४१ क्रमांकाच्या खुर्च्या तुटलेल्या आहेत. तिसऱ्या स्तरावरील म्हणजेच मागच्या बाजूला सर्वाधिक खुर्च्या तुटलेल्या आहेत. पहिल्या रांगेतील १, २, ८, १७, ४५ क्रमांकाच्या खुर्च्या तुटलेल्या आहेत. २० आणि २६ क्रमांकाची खुर्ची तर गायब आहे. दुसऱ्या रांगेतील ३४, ३८, ३२, २५, २२, २० क्रमांकाच्या खुर्च्या तुटलेल्या आहेत. १, २ , ४ आणि ३५ क्रमांकार्ची खुर्ची गायब आहे. तिसऱ्या रांगेतील ११, १७, १९, २०, २१, २२, ३०, ३६, ३७, ३९ क्रमांकाच्या खुर्च्या तुटल्या आहेत. २३, ३२ आणि ४६ क्रमांकाची खुर्ची गायब आहे. चौथ्या रांगेतील ९, २८, २९, ३१ व्या क्रमांकाची खुर्ची तुटलेली आहे. पाचव्या रांगेतील ११, २१, २२, ३३, ३४, ४३ व्या क्रमांकाची, सहाव्या रांगेतील ६, ७, ९, ११, १७, ३५, ४५ क्रमांकाची खुर्ची, सातव्या रांगेतील ४, २१, २४, २५, २६, २७, २८, ३०, ३१, ४१, ४२ क्रमांकाची खुर्ची, आठव्या शेवटच्या रांगेतील १ ते १५ पर्यंतच्या खुर्च्या तुटलेल्या आहेत. २५, २६, ४०, ४१ क्रमांकाची खुर्ची गायब आहे. ३३,३५, ३६, ३७, ३८, ३९ क्रमांकाच्या खुर्च्या तुटलेल्या आहेत.
क्रमांकामध्येही अनियमितता
सभागृहामध्ये अनेक व्यावसायिक कार्यक्रम होत असतात. उदाहरणार्थ नाटकांचे प्रयोग. यासाठी खुर्चीचा क्रमांक महत्त्वाचा असतो. परंतु सभागृहातील सध्या खुर्च्यांच्या क्रमांकवारीत अनियमितता दिसून येते. त्यामुळे नाटकाच्या प्रयोगाला येणाऱ्यांच्या तिकिटांवर खुर्चीचा क्रमांक असेल तर मोठी अडचण होते.

Web Title: Chair breaks in the Deshpande hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.