कन्या कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

By Admin | Updated: August 21, 2016 03:26 IST2016-08-21T03:26:28+5:302016-08-21T03:26:28+5:30

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी महाराष्ट्र सरकारच्या ..

Certificate of allotment to beneficiaries of Kanya Kalyan Yojana | कन्या कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

कन्या कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

महापालिका : ३७ लाभार्थ्यांना रोख रकमेचा लाभ
नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी महाराष्ट्र सरकारच्या सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेच्या ३७ लाभार्थ्यांना रोख रक्कम व बचत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आरोग्य समितीचे सभापती देवेंद्र मेहर, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, मनीषा कोठे आदी उपस्थित होते.
लाभार्थीत ३३ टक्के मुस्लिम कुटुंबीयांचा समावेश आहे. ही योजना गरजंूपर्यंत पोहचवण्याचे आवाहन दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले. एक किंवा दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्यांना रोख दोन हजार व आठ हजारांचे बचत प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी लाभार्थी महाराष्ट्रातील अधिवासी असावा, दारिद्र्यरेषेखालील असावा, शासकीय रुग्णालयातून शस्त्रक्रिया केलेली असणे गरजेचे आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी सविता मेश्राम यांनी प्रास्ताविकातून दिली.
यावेळी एका मुलीनंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबीयांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुषमा कानडे, सुनीता पाटील, दीपाली डहाके, मीरा पाटील, नंदा बारापात्रे आदींनी परिश्रम घेतले.
संचालन डॉ. विजया जोशी यांनी तर डॉ. मो.ख्वाजामोईनुद्दीन यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Certificate of allotment to beneficiaries of Kanya Kalyan Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.