‘शंभर नंबरी सक्सेस’ची ‘सेंच्युरी’

By Admin | Updated: June 18, 2014 01:33 IST2014-06-18T01:33:48+5:302014-06-18T01:33:48+5:30

शालांत परीक्षांच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळांचेदेखील यंदा चांगले दिवस आले आहेत. नागपूर शहरातील शंभराहून अधिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामुळे निकालानंतर मंगळवारी

Century of 'hundred numeral succes' | ‘शंभर नंबरी सक्सेस’ची ‘सेंच्युरी’

‘शंभर नंबरी सक्सेस’ची ‘सेंच्युरी’

यंदा दुप्पट यश: शंभरहून अधिक शाळांची चमकदार कामगिरी
शालांत परीक्षांच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळांचेदेखील यंदा चांगले दिवस आले आहेत. नागपूर शहरातील शंभराहून अधिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामुळे निकालानंतर मंगळवारी शहरातील शाळांमध्ये सेलिब्रेशनचे वातावरण होते. वाढत्या स्पर्धेमुळे मागील वर्षापेक्षा यंदा निकालात शाळांमध्ये देखील चांगलीच चुरस पहायला मिळाली. पंडित बच्छराज शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरात ‘टॉप’ करून इतर शाळांना आश्चर्यचकित केले. नागपुरातील १०६ शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. मागील वर्षी सुमारे ४५ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता.
यंदा दुपटीहून अधिक शाळांचा निकाल ‘सेंट परसेंट’ लागला आहे. त्यातही सोमलवार रामदासपेठ, सोमलवार निकालस, व्ही.टी.कॉन्व्हेंट या शाळांमध्ये तर जास्तच चुरस पहायला मिळाली. परंतु ज्या शाळांची नावेदेखील फारशी चर्चेत नसतात अशा अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. निकाल चांगला लागावा यासाठी शाळांनी निरनिराळे प्रयोग राबविले होते. विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा त्यांनी प्रयत्न तर केलाच, मात्र टेस्ट सिरीजवर देखील भर दिला होता. बहुतांश शाळांनी परीक्षा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांची उजळणी घेतली होती.

Web Title: Century of 'hundred numeral succes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.