शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी मोबाईलच्या प्रकाशात केली शेतीच्या नुकसानीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 00:50 IST

परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतक-यांच्या शेतातील उभ्या धान व कपाशीसह इतर पिकांना अक्षरश: लोळविले. शेतकरी हवालदिल झाला. मदतीसाठी टाहो फोडला. मात्र मदत मिळाली नाही.

- शरद मिरेभिवापूर - परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतक-यांच्या शेतातील उभ्या धान व कपाशीसह इतर पिकांना अक्षरश: लोळविले. शेतकरी हवालदिल झाला. मदतीसाठी टाहो फोडला. मात्र मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतक-यांनी नुकसानग्रस्त शेतपिकांची आवरासावर (कापणी) केली. आता शेतातील पिके दिसेनासे झाल्यानंतर केंद्र सरकारचे विशेष पथक सोमवारी नुकसानीची पाहणी करण्याकरिता तालुक्यात दाखल झाले. अंधारात शेतक-यांच्या बांधावर पोहोचलेल्या या पथकाने मोबाईलच्या टॉर्चमध्ये शेतातील नुकसानीची पाहणी केली. त्यामुळे मोबाईलच्या प्रकाशात या अधिका-यांना नुकसान दिसले कसे, हा प्रश्नच आहे.  कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक आर.पी. सिंग यांच्या मुख्य उपस्थितीत हे पथक सोमवारी  सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भिवापूर येथे दाखल झाले. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले आदी अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण दिवस सोडून सूर्यास्तानंतर आलेल्या या पथकाला भिवापुरातच अंधाराने घेरले. अंधारातच या पथकाने नक्षी शिवारातील ऋषीकेश लोहकरे यांचे शेत गाठले. अन् कशी-बशी नुकसानीची पाहणी केली. यावेळी सायंकाळचे ६.३० वाजल्यामुळे पूर्णत: अंधार पडला होता. दरम्यान शेतातील नुकसान, नुकसानग्रस्त शेतकरी आणि पथकातील अधिका-यांचे चेहरेसुद्धा एकमेकांना दिसत नव्हते. त्यामुळे मोबाईलच्या टॉर्चमध्ये नुकसानीची पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम या पथकाने उरकला. धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर यातून कपाशीचे पीक सुटणार असा प्रश्न कदाचित या पथकाला पडला असावा त्यामुळे लगतच्याच प्रवीण गजभिये या शेतक ºयाच्या कपाशीच्या शेतात पाय ठेवत पथकाने पाहणी केली. अंधारामुळे रस्ता कुठे आणि शेत कुठे? खड्यात पाय ठेवत, या पथकाने नुकसानीचा पाहणी कार्यक्रम अर्ध्या तासात उरकला. दाटलेल्या अंधारात या अधिका-यांना खरंच नुकसान दिसले काय? की निवळ कागदपत्र रंगविण्याचे सोपस्कार पार पाडल्या गेले, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.या दौ-यात उपविभागीय अधिकारी हिरामण झिरवाळ, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी पी.एम. डाखळे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे, सहायक गट विकास अधिकारी रोषनकुमार दुबे, कृषी अधिकारी रवींद्र राठोड यांच्यासह नगराध्यक्ष किरण नागरीकर, नंदा नारनवरे, बाळू इंगोले, राहुल गुप्ता, संदीप निंबार्ते, विजय वराडे, विठ्ठल राऊत, तुळशीदास चुटे, राजू गारघाटे, रमेश भजभुजे, वसंता ढोणे, कवडू नागरीकर, दिलीप गुप्ता, चंदू पारवे, विकास जवादे, राकेश धोटे, युवराज करणुके, आनंद पुनवटकर, उमेश ढोरे, भक्तदास चुटे, बंडू ढाकुनकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती