शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळा झाली ‘पेपरलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 10:12 IST

अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन महिन्यांच्या प्रयत्नानंतर ‘केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळे’ला नवे रूपच दिले, सोबत या योजनेला ‘पेपरलेस’ही केले.

ठळक मुद्देनागपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा उपक्रम संगणकावर येणार चाचण्यांचे अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय शास्त्रात उपचाराची पहिली पायरी म्हणजे रुग्णाच्या आजाराचे प्रथमत: निदान. त्यामुळेच रुग्णालयांतील पॅथालॉजी प्रयोगशाळा (लॅब) महत्त्वाची ठरते. परंतु मेडिकलमध्ये रक्त, मल, मूत्राची चाचणी करण्यापासून ते त्याचा अहवाल येईपर्यंत दुसऱ्या दिवसांची प्रतीक्षा करावी लागायची. यातच चाचणीच्या अहवालातील त्रुटी, तो अहवाल मिळविण्यासाठी रुग्णांना माराव्या लागणाऱ्या चकरांमुळे गोंधळाचे वातावरण झाले होते. याची दखल घेत अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन महिन्यांच्या प्रयत्नानंतर ‘केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळे’ला नवे रूपच दिले, सोबत या योजनेला ‘पेपरलेस’ही केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) चार वर्षांपूर्वी केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळेला सुरुवात झाली. परंतु त्यात नियोजन नव्हते. याचा फायदा रुग्णांसोबतच रुग्णालय प्रशासनाला होत नव्हता. रुग्णांना साध्या चाचणीसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागायचे. त्याचदिवशी अहवाल मिळण्याची हमीही मिळायची नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत लागून अहवाल मिळवावा लागायचा तर काहींना या अहवालासाठी चकरा माराव्या लागायच्या. धक्कादायक म्हणजे, अहवालातील चुका वाढल्या होत्या. काही डॉक्टर गरज नसताना चाचण्या लिहून देऊन पॅथालॉजीचे काम वाढवायचे. याची दखल अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी घेऊन केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळेचे स्वरूपच बदलण्याच्या प्रयत्नाना सुरुवात केली. पॅथालॉजी, मायक्रोबायोलॉजी व बायोकेमेस्ट्री या ‘लॅब’च्या तंत्रज्ञांना केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळेच्याखाली आणले. यामुळे अर्ध्या तासात सामान्य चाचण्यांचे अहवाल उपलब्ध होण्याची शक्यता वाढली. दुसरे म्हणजे, रुग्णांना नोंदणी करण्यापासून ते नमुना देण्यापर्यंत वेगवेगळ्या रांगेतून जावे लागायचे त्यांच्यासाठी आता एकच खिडकी केली.या खिडकीवर नोंदणीपासून ते नमुने घेण्याची सोय करण्यात आली. विशेष म्हणजे, केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळेला ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेन्ट सिस्टीम’शी जोडण्यात आले. यामुळे डॉक्टरांना आता रुग्णाला कागदावर चाचणी लिहून न देता संगणकावर चाचणी लिहून द्यायची आहे. रुग्ण प्रयोगशाळेत गेल्यास त्याला केवळ नोंदणी कार्ड दाखवायचे आहे. या कार्डवरील नंबर संगणकात टाकताच त्या रुग्णाची संपूर्ण माहिती समोर येऊन पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल. चाचणीचा अहवाल डॉक्टरांना त्यांच्या संगणकावर दिसेल.

नव्या चाचण्यांचीही भर पडणारकेंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळा ‘पेपरलेस’ केल्याने रुग्णच नव्हे तर रुग्णालय प्रशासनासाठी सोईचे ठरले आहे. तूर्तास याची सुरुवात बाह्यरुग्ण विभागापासून करण्यात आली असलीतरी लवकरच आंतर रुग्णांचाही यात समावेश करण्यात येईल. विशेष म्हणजे, ज्या चाचण्या आतापर्यंत मेडिकलमध्ये होत नव्हत्या त्यांचाही यात समावेश करण्याचा प्रयत्न असणार आहे.-डॉ. अभिमन्यू निसवाडेअधिष्ठाता, मेडिकल.

टॅग्स :Nagpur Government Medical College and Hospitalनागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय