लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवर असलेले मध्यवर्ती कारागृह कोराडी रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलजवळ असलेल्या बेल्लोरी - बाबुलखेडा येथे स्थानांतरित केले जाणार आहे, यासाठी १५० एकर जागा सुद्धा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.बावनकुळे यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती देण्याचे मात्र टाळले. परंतु त्यांनी हे स्पष्ट केले की, मध्यवर्ती कारागृहासाठी नवीन जागा उपलब्ध आहे. नवीन कारागृह हे अत्याधुनिक राहील. यात व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून कैद्यांची पेशीची व्यवस्था असेल. वर्धा रोडवरील कारागृह हटल्यानंतर त्या जागेचा वापर अजनी रेल्वे स्टेशनच्या विस्तारासाठी केला जाईल.मध्य प्रदेश देणार पाणीबावनकुळे यांनी सांगितले की, पेंच प्रकल्पात पाण्याची कमतरता पाहता राज्य सरकराने मध्य प्रदेश सरकारकडे चौराई बांधातून पाच एमएलडी पाणी सोडण्याची मागणी केली आहे यासंदर्भात त्यांची मध्य प्रदेशच्या प्रधान सचिवांसोबत चर्चाही झाली आहे. पाण्याच्या मागणीसाठी ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचीही भेट घेणार आहेत. मध्य प्रदेश पाणी देण्यासाठी तयार आहे. परंतु ते पाणी केवळ कृषीसाठी असेल. जिल्ह्यात पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. मे पर्यंत कुठलीही समस्या नाही. तोतलाडोह येथे पाणी साठवण्यासाठी १०५० कोटी रुपयांच्या योजनेचे प्रारुप तयार केले जात आहे. दीर्घकालीन योजना तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहे.
सेंट्रल जेल कोराडी रोडवरील बाबुलखेड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:26 IST
वर्धा रोडवर असलेले मध्यवर्ती कारागृह कोराडी रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलजवळ असलेल्या बेल्लोरी - बाबुलखेडा येथे स्थानांतरित केले जाणार आहे, यासाठी १५० एकर जागा सुद्धा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सेंट्रल जेल कोराडी रोडवरील बाबुलखेड्यात
ठळक मुद्दे१५० एकर जागा निश्चित