केंद्र सरकार आयुर्वेदाच्या पाठीशी
By Admin | Updated: July 15, 2015 03:43 IST2015-07-15T03:43:15+5:302015-07-15T03:43:15+5:30
आयुर्वेद ही एक सक्षम चिकित्साप्रणाली असून तिचा सार्वजनिक आरोग्यातील सहभाग वाढविण्यासाठी केंद्र सरकार ...

केंद्र सरकार आयुर्वेदाच्या पाठीशी
नागपूर : आयुर्वेद ही एक सक्षम चिकित्साप्रणाली असून तिचा सार्वजनिक आरोग्यातील सहभाग वाढविण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. आयुर्वेद व्यासपीठाच्यावतीने आयोजित भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेवर नवनिर्वाचित सदस्यांचा जाहीर अभिनंदन व कार्यकर्ता कृतज्ञता कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकार मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक आयुर्वेद रुग्णालय उभारणार असल्याचेही यावेळी गडकरी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुर्वेद व्यासपीठाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. संतोष नेवपूरकर होते. अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, रवींद्र भुसारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सदस्य डॉ. जयंत देवपुजारी, डॉ. सदानंद सरदेशमुख, डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. आशानंद सावंत, डॉ. ज्ञानेश्वर थोरात व डॉ. जुबेर शेख यांचा सत्कार करण्यात आला.