शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाने मनपा आयुक्तांना बजावली नोटीस

By मंगेश व्यवहारे | Updated: April 12, 2023 14:40 IST

खुल्या संवर्गातील तीन कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यकाची नियुक्ती करण्याबाबतची जाहिरात तात्काळ रद्द करावी अशी मागणी

नागपूर :नागपूर महापालिकेच्या आस्थापना विभागामार्फत २७ मार्च २०२३ रोजी कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यक या तीन पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ११ एप्रिल रोजी मुलाखती होत्या. परंतु मनपाने विधी अधिकारी सहायक पदाच्या भरतीत आरक्षणाच्या आकृतीबंधाला डावलल्याने केंद्र सरकारचा अनुसूचित जाती आयोगाने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना नोटीस बजावली असून येत्या १५ दिवसात केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाला आपला विस्तृत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती ॲड. राहुल झांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ॲड. झांबरे यांचे म्हणणे आहे की मनपामध्ये लोकप्रतिनिधी कार्यरत नसतांना आणि राज्य सरकारची कोणतीही पूर्व परवानगी न घेता मनपाचा आकृतिबंधामध्ये नमूद नसलेल्या पदाची जाहिरात मनपा आयुक्तांनी केवळ हेतुपुरस्सरपणे काढली आहे. जे संपूर्णतः कायदेकक्षाचा बाहेर असून असंविधानिक आहे. केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाने १० एप्रिल २०२३ ला मनपा आयुक्तांना नोटीस बजाविल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी मनपा आयुक्तांनी तडकाफडकी उमेदवारांच्या थातुरमातुर मुलाखती घेऊन आयोगाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे. याशिवाय मनपाचा मागासवर्गीय कक्षाचीही आरक्षण बिंदु नियमावलीची पूर्व परवानगीही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी घेतली नसल्याचा आरोपही यावेळी अँड. राहुल झांबरे यांनी केला आहे. त्यामुळे २७ मार्च २०२३ रोजी विशिष्ट अशा केवळ खुल्या संवर्गातील तीन कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यकाची नियुक्ती करण्याबाबतची जाहिरात तात्काळ रद्द करावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली.

यावेळी ॲड. प्रतिक पाटील, ॲड. नितीन गवई, ॲड. समिंद्रा करवाडे, ॲड. राजन फ़ुलझेले, ॲड. युवराज कांबळे, ॲड. मधुकर गडकरी आदी उपस्थित होते. आयुक्तांनी खुलासा दिलेल्या वेळेत न दिल्यास मनपा आयुक्तांवर आयोगातर्फे समन्स बजावण्यात येईल अशी तंबीसुद्धा दिल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर