शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कायदा करावा; विजय दर्डा यांची अमित शाह यांच्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 12:54 IST

Lokmat News: पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कायदा करावा, अशी मागणी विजय दर्डा यांनी केली आहे.

नागपूर - ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहेत. या कार्यक्रमामध्ये  ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आणि  माजी खासदार विजय दर्डा यांनी पत्रकारांसाठी एक महत्त्त्वपूर्ण मागणी अमित शाह यांच्याकडे केली आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कायदा करावा, अशी मागणी विजय दर्डा यांनी केली आहे.

याबाबत अमित शाह यांच्याकडे मागणी करताना विजय दर्डा म्हणाले की, आज मी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एक मागणी करणार आहे. हा प्रश्न मी माझ्या राज्यसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळामध्ये संसदेतही उपस्थित केला होता. या देशात हजारो पत्रकार, फोटोग्राफर आहेत. ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काम करतात. त्यांच्यावर वेळोवेळी हल्ले होत असतात. तुम्ही एक असा कायदा बनवा ज्यामुळे ते सुरक्षित राहतील, माझ्या या मागणीचा तुम्ही विचार कराल, अशी अपेक्षा आहे, विजय दर्डा म्हणाले.

यावेळी विजय दर्डा यांनी जवाहरलाल दर्डा यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचाही उल्लेख केला. ते म्हणाले बाबूजींनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिलं आहे. बॅकबे रेक्लमेशन असेल किंवा महाराष्ट्रात हौसिंग निर्मिती असेल किंवा वीजनिर्मिती असेल किंवा उद्योग असेल, याबाबतीत त्यांनी योगदान दिले आहे. बाबूजींच्या योगदानाची दखल घेत त्यांच्यावर नाणं काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी ११ वाजता नागपूरच्या रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात महासोहळा सुरू आहे. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित आहेत. सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित आहेत.   

टॅग्स :Journalistपत्रकारLokmatलोकमतVijay Dardaविजय दर्डाAmit Shahअमित शाह