राम मंदिरासाठी केंद्राने कायदा बनवावा : विहिंपची मागणी

By Admin | Updated: March 21, 2017 21:37 IST2017-03-21T21:37:51+5:302017-03-21T21:37:51+5:30

अयोध्या येथील वादग्रस्त जागेवर राम मंदिरच व्हावे यासाठी विश्व हिंदू परिषद आग्रही आहे

Center should make law for Ram Mandir: Demand for VHP | राम मंदिरासाठी केंद्राने कायदा बनवावा : विहिंपची मागणी

राम मंदिरासाठी केंद्राने कायदा बनवावा : विहिंपची मागणी

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 21 - अयोध्या येथील वादग्रस्त जागेवर राम मंदिरच व्हावे यासाठी विश्व हिंदू परिषद आग्रही आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हा संवेदनशील मुद्दा चर्चेद्वारे सोडविण्यात यावा, असा अभिप्राय दिला. राममंदिराच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाने कायदाच बनवावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले. १९९१ मध्ये विहिंप व बाबरी अ‍ॅक्शन कमिटीमध्ये चर्चा झाली होती. मात्र विहिंपने मंदिर असल्याचे पुरावे सादर केल्यानंतर कमिटीचे लोक बैठकीला आलेच नाही. न्यायालयातदेखील हे पुरावे सादर करण्यात आले आहे. संबंधित जमीन ही रामाची असून तेथे भव्य राममंदिर बनलेच पाहिजे, अशी रामजन्मभूमी न्यास व विहिंपची अगोदरपासूनची भुमिका आहे. संविधानिक पद्धतीने मंदिर निर्मिती करायची असेल तर केंद्राने यासंदर्भात कायदा बनवावा आणि संसदेत याला मंजूर करुन घ्यावे, अशी मागणी तोडगिया यांनी केली आहे.

Web Title: Center should make law for Ram Mandir: Demand for VHP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.