शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
SA vs BAN : WHAT A MATCH! माफक लक्ष्य पण संघर्ष मोठा; गोलंदाजांची कमाल, अखेर बांगलादेश चीतपट
3
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
4
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
5
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
6
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
7
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
8
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
9
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
10
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
11
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
12
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
13
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
14
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
15
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
16
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
17
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
18
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
19
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
20
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

नागपुरातील  सिमेंट रोड वाहतूक पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 9:18 PM

नागरिकांच्या सुविधेसाठी शहरात ठिकठिकाणी सिमेंट रोड बांधले जात आहेत. परंतु, बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. अपूर्ण सिमेंट रोड वाहतुकीला अडथळे निर्माण करीत आहेत. त्याची वाहतूक पोलीस विभागाने गंभीर दखल घेऊन कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे व मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देकंत्राटदारांना नोटीस : मानकांचे पालन करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागरिकांच्या सुविधेसाठी शहरात ठिकठिकाणी सिमेंट रोड बांधले जात आहेत. परंतु, बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. अपूर्ण सिमेंट रोड वाहतुकीला अडथळे निर्माण करीत आहेत. त्याची वाहतूक पोलीस विभागाने गंभीर दखल घेऊन कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे व मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.वाहतूक पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. बैठकीत सिमेंट रोड कंत्राटदारांना बोलावण्यात आले होते. दरम्यान, प्रामुख्याने वाहतुकीचा दबाव अधिक असलेल्या रोडवर संथ गतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांना स्पष्टीकरण मागण्यात आले. कॉटन मार्केट चौक ते आग्याराम देवी मंदिर चौकापर्यंत रोडवर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. या परिसरात मेट्रोचेही काम केले जात आहे. त्यामुळे येथे दिवसभर वाहतूक कोंडी होते. यावर कंत्राटदार अश्विनी डेव्हलपर्सला उत्तर मागण्यात आले. ‘लोकमत’ने या कामातील अनियमिततेवरही प्रकाश टाकला होता. त्यासोबतच रिंग रोडचे काम करणाऱ्या आरपीएस, वेस्ट हायकोर्ट रोडचे काम करणाऱ्या जेपीईएसआर एंटरप्रायजेस व सेंट्रल बाजार रोडचे काम करणाऱ्या युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीला दिरंगाईवर स्पष्टीकरण मागण्यात आले. एवढेच नाही तर, लक्ष्मीनगर ते माटे चौक रोडच्या कामावरही वाहतूक विभाग असमाधानी आहे.कंत्राटदारांना रोडवर बोर्ड लावून त्यावर स्वत:चे नाव, काम सुरू करण्याची तारीख, काम समाप्त करण्याची तारीख व कामाची रक्कम याची माहिती नमूद करणे आवश्यक आहे. तसेच, त्यावर पोलीस विभागाची अधिसूचना चिपकवायला पाहिजे. कामाच्या ठिकाणी वॉर्डन नियुक्त करायला पाहिजे. तसेच, एलईडी स्टीक, ब्लिंकर लावणे आवश्यक आहे. परंतु, या नियमांचे उल्लंघन होत आहे.वेगात काम करण्याचे निर्देश - एस. चैतन्यकंत्राटदारांना मानकानुसार वेगात काम पूर्ण करावे लागेल. बैठकीमध्ये कंत्राटदारांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, मानकांकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी दिली.महापालिका उदासीनमहापालिका सिमेंट रोडच्या कामाबाबत उदासीन आहे. सिमेंट रोडच्या गुणवत्तेवर आक्षेप घेतले जात असताना मनपाच्या एकाही अधिकाऱ्याला त्रुटी आढळून आलेल्या नाहीत. सिमेंट रोडचे पहिल्या टप्प्यात केवळ ५० तर, दुसऱ्या टप्प्यात केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad transportरस्ते वाहतूक