शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

नागपुरातील सिमेंट रोड आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:36 AM

नागपूर महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीचा फटका तिसऱ्या टप्प्यातील ३०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांना बसला आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीपुढे आव्हानतिसऱ्या टप्प्यातील कामांना ३०० कोटींची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. परंतु महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीचा फटका तिसऱ्या टप्प्यातील ३०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांना बसला आहे. यात राज्य सरकार, नासुप्र व महापालिका यांना प्रत्येकी १०० कोटींचा वाटा उचलावयाचा आहे. प्रथम राज्य सरकारने १०० कोटींचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी महापालिकेने केली आहे. तर प्रथम महापालिकेने १०० कोटींचा वाटा उचलावा, अशी सरकारची भूमिका आहे. परिणामी कार्यादेश झाले, पण ‘पहिले आप’च्या वादात तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडची कामे थांबलेली आहेत. निधी कसा उपलब्ध करावा, असे गंभीर आव्हान स्थायी समितीपुढे उभे ठाकले आहे.पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यात ३०० कोटींचे ५९ सिमेंट रोड निविदा प्रक्रिया झाल्यापासून ११ महिन्याच्या आत पूर्ण करावयाचे होते. हा कालावधी कधीच संपला आहे. ३७ रस्ते पूर्ण झाले असून, उर्वरित २२ रस्त्यांची कामे संथगतीने वा रखडलेली आहेत. महापालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने कामे रखडलेली आहेत.तिसऱ्या टप्प्यात पुन्हा ३०० कोटींचे रस्ते करावयाचे आहेत. यात महापालिकेला १०० कोटींचा वाटा उचलावयाचा आहे. प्रथम महापालिकेने वाटा उचलावा त्यानंतर राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होईल, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. नासुप्रने ६४ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. परंतु या रकमेत सिमेंट रस्त्यांची कामे होणे शक्य नाही. आर्थिक स्थितीचा विचार करता, महापालिकेने राज्य सरकारकडे निधी उपलब्ध करण्यासाठी आग्रह धरला आहे. भाजपने २०१२ च्या निवडणूक जाहीरनाम्यात सिमेंट रस्त्यांचे आश्वासन दिले होते. त्यानुसार तीन टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची घोषणा झाली. यातील पहिल्या टप्प्यातील कामे जवळपास पूर्ण झाली. दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांची कामेही सुरू झाली. परंतु २२ रस्त्यांची क ामे रखडलेली आहेत वा अद्याप सुरू झालेली नाहीत. तिसऱ्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत. रस्त्यांचे सर्वेक्षणही करण्यात आलेले आहे. परंतु निधीअभावी या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करता आलेली नाही.

स्थायी समितीपुढे आव्हानमहापालिकेकडे ५०० कोटींची देणी आहेत. कंत्राटदारांचे ३०० कोटींचे बिल थकीत आहे. बिलासाठी आंदोलन सुरू आहे. आपली बसच्या आॅपरेटरची थकबाकी ६० कोटींवर गेलेली आहे. कर्मचाºयांना वाढीव भत्ता व देणी द्यावयाची आहेत. याचा विचार करता, तिसºया टप्प्यातील सिमेंट रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करण्याचे गंभीर आव्हान स्थायी समितीपुढे उभे ठाकले आहे. शासनाकडून १५० कोटी मिळाले तरी ५०० कोटींच्या देणीचा विचार करता ही रक्कम कमीच आहे. यामुळे यातून स्थायी समिती कोणता मार्ग काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिला टप्पा एकूण रस्ते : ३०रस्त्यांची लांबी : २५ कि.मी.एकूण रस्त्याचा खर्च : १०४ कोटी

दुसरा टप्पाएकूण खर्च : ३०० कोटीएकूण रस्ते : ५९एकूण रस्त्यांची लांबी : ६६.३२ कि.मी.पूर्ण झालेले रस्ते ३७ कि.मी.अपूर्ण वा न झालेले रस्ते २९.३२ कि .मी.

तिसरा टप्पा एकूण रस्ते : ३९एकूण खर्च : ३०० कोटीएकूण रस्त्यांची लांबी : ३९ कि.मी.कार्यादेश झाले,पण कामांना सुरुवात नाही

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका