शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सिमेंट रोडमुळे पर्यावरण आणि आरोग्य धोक्यात ! उच्च न्यायालयाचा सरकारला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:17 IST

हायकोर्टाची नाराजी : केंद्र व राज्य सरकारला फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुरेसा वेळ मिळाल्यानंतरही केंद्र व राज्य सरकारसह इतर सर्व प्रतिवादींनी सिमेंट काँक्रिट रोडवरील आरोपांवर मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठामध्ये उत्तर सादर केले नाही. परिणामी, न्यायालयाने बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त करून सर्वांना फटकारले. सिमेंट काँक्रिट रोडसंदर्भात राज्यभरात तक्रारी आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे, असे न्यायालय म्हणाले.

सिमेंट काँक्रिट रोडविरुद्ध जनमंच या सामाजिक संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल पानसरे व महेंद्र नेरलीकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने गेल्या २ एप्रिलला केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग विभागाचे सचिव, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रादेशिक अधिकारी, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक, महानगरपालिका आयुक्त, नागपूर सुधार प्रन्यास सभापती, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त यांना नोटीस बजावून याचिकेतील आरोपांवर २३ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते परंतु, आतापर्यंत एकाही प्रतिवादीने उत्तर सादर केले नाही. न्यायालयाने आता शेवटची संधी म्हणून सर्वांना येत्या २० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. परवेझ मिर्झा यांनी बाजू मांडली.

असे आहेत आरोपसिमेंट काँक्रिट रोड पर्यावरण व माणसांसाठी धोकादायक आहे. या रोडचे अनेक दुष्परिणाम आहेत. या रोडमुळे वातावरणातील तापमान वाढते. बिटूमेन रोडच्या तुलनेत वातावरणात जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सोडले जाते. पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. परिणामी, पूर येतो. या रोडवर वाहन चालविल्यास इंधन जास्त खर्च होते. वाहनचालकांना थकवा येतो. सिमेंट रोड टणक राहत असल्यामुळे वाहने उसळतात. त्यातून शरीराच्या सांध्यांना दुखापत होते. अपघात झाल्यास वाहनचालकांना गंभीर इजा होते, आदी गंभीर आरोप याचिकेत करण्यात आले आहेत. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय