शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकऐवजी सिमेंटचे बॅरिकेड्स, लोकांचे जीव घ्यायचे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:53 IST

Nagpur : घोराड बायपासवर अपघातात तिघे जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अगदी न दिसण्यासारखा डायर्व्हेशनचा बोर्ड लावला. पुढे प्लास्टिकऐवजी सिमेंटचे बॅरिकेड्स लावले. यामुळे मंगळवारी (दि.२४) रात्री एक कार या सिमेंटच्या बॅरिकेडवर आदळून कारमधील तिघे जखमी होऊन कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना कळमेश्वरपासून २ किलोमीटर अंतरावर घोराड बायपासवर घडली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदाराच्या चुकीमुळे परिसरात अपघातांची मालिकाच सुरू असून, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. या प्रकरणी कळमेश्वर पोलिस ठाण्यात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रा. मृण्मय मेश्राम (३४, काटोल) हे मंगळवारी (दि.२४) रात्री ८:३० वाजता कारने आपल्या दोन भावांसह काटोलवरून कळमेश्वरला जात होते. मार्गात कळमेश्वरपूर्वी २ किलोमीटर अंतरावर असलेल्या घोराड बायपासवर त्यांची कार सिमेंटच्या बॅरिकेड्सला जाऊन धडकली. सिमेंटच्या बॅरिकेड्सपूर्वी 'एनएचएआय'ने डायव्हर्शनचा एक बोर्ड लावला होता. हा बोर्ड वाहनचालकांना दिसतही नाही इतका लहान आहे. त्यानंतर पुढे काही अंतरावर प्लास्टिकऐवजी सिमेंटचे तीन बॅरिकेड्स लावले आहेत. मेश्राम यांनां डायव्हर्शनचा बोर्ड न दिल्यामुळे त्यांची कार सिमेंटच्या बॅरिकेड्सवर जाऊन आदळली. यात कारचा समोरील भाग आणि दरवाजांचे मोठे नुकसान झाले. अपघातात कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या भावंडांना किरकोळ मार लागला. परंतु हा अपघात जीवघेणा ठरू शकला असता, असे मेश्राम यांनी सांगितले. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व संबंधित कंत्राटदाराने सिमेंटऐवजी प्लास्टिकचे बॅरिकेड्स लावले असते तर त्यांना जखमा न होता कारचे नुकसानही झाले नसते. अपघातानंतर कळमेश्वर येथील शिंदेसेनेचे तालुका प्रमुख ब्रिजलाल रघुवंशी यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना मदत केली. या अपघाताबद्दल मेश्राम यांनी कंत्राटदाराविरुद्ध कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या अपघाताला कारणीभूत कंत्राटदार कंपनी आणि कंत्राटदाराचे नाव माहित नसल्यामुळे मेश्राम यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत कंत्राटदार असा उल्लेख केला आहे.

अनेकांचे अपघात, फॅक्चरही झालेकळमेश्वर परिसरात अनेक ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. डायर्द्धशनवा न दिसण्यासारखा बोर्ड आणि सिमेंटचे बरिकेड्स यांमुळे या परिसरात अनेकांचा अपघात होत असून काही वाहनचालकांचे हात-पाय फ्रैक्चरही झाले आहेत, कळमेश्वरजवळ सुरू असलेल्या ओव्हरब्रिजच्या कामाच्या ठिकाणीही सिमेंटचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे 'एनएचएआय'ने वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन डायव्हर्शनचा मोठा फलक लावून सिमेंटऐवजी प्लास्टिकचे बॅरिकेड्स लावण्यत्वी मागणी होत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरroad safetyरस्ते सुरक्षा