सती अनसूया माता पुण्यतिथी साेहळा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST2021-02-07T04:09:21+5:302021-02-07T04:09:21+5:30
रोटरी क्लब नागपूर सेंट्रलच्या अध्यक्षपदी बैस नागपूर : रोटरी क्लब नागपूर सेंट्रलच्या नुकत्याच झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीमध्ये वर्ष ...

सती अनसूया माता पुण्यतिथी साेहळा साजरा
रोटरी क्लब नागपूर सेंट्रलच्या अध्यक्षपदी बैस
नागपूर : रोटरी क्लब नागपूर सेंट्रलच्या नुकत्याच झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीमध्ये वर्ष २०२१-२२ करिता सतीश बैस यांची अध्यक्ष म्हणून निवड. सचिवपदी वासू ठाकरे यांची निवड करण्यात आली. सध्याचे अध्यक्ष श्याम पांढरीपांडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. याप्रसंगी माजी अध्यक्ष मोहन चौथनी, आलोक वैद्य, प्रदीप नगरारे, रमेश पंधागरे, अजय पंधे, डॉ. सीमा श्रीवास्तव, अरुण श्रीवास्तव, राजकुमारी रॉय, सचिव डॉ. अर्चना चौधरी आणि कोषाध्यक्ष सुरेश रायलू उपस्थित हाेते.
असंघटित कामगारांसाठी संघटनेची स्थापना
नागपूर : असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हितासाठी नुकतीच महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. देशात ९४ टक्के कामगार असंघटित क्षेत्रात आहेत. मात्र, संघटन बांधनी नसल्याने त्यांच्या हिताकडे सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. काेराेना काळात लाॅकडाऊनमुळे या क्षेत्रातील लाखाे कामगारांवर बेराेजगारीची कुऱ्हाड काेसळली. त्यांच्या कुटुंबांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मात्र, अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या वर्गाकडे लक्ष दिले जात नाही. त्यासाठीच ही संघटना काम करेल, असा विश्वास अमृत मेश्राम यांनी दिला. यावेळी सुनील सदार, डाॅ. राजेश अय्यर, यशवंत हांडे, सुनील पालिवाल, डाॅ. आरती पडाेळे, डाॅ. रवी गिऱ्हे, राहुल फाळके, भूषण नागपुरे आदी उपस्थित हाेते.