शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गुढीपाडव्याचा जल्लोष; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुढीचं पूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 10:38 IST

पाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन

नागपूर : आज गुढीपाडवा! साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस. यानिमित्त नागपुरात आज शोभायात्रेचं आयोजन करण्यात आल. ढोल ताशांच्या गजरात उत्साहात मिरवणूक निघाली. या शोभायात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते गुढीचं पूजन करण्यात आलं. यावेळी मृणाल कुलकर्णी, गिरीजा ओक-गोडबोले यांचीही विशेष उपस्थिती होती.

शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असलेला गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. नागपुरात गुढीपाडव्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे. घरोघरी दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं जातंयं. पारंपरिक पोशाख परिधान करून तरुण तरुणी शोभायात्रेत सहभागी झाले. तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौक अशी ही शोभायात्रा काढण्यात आली. उपमुख्यमंत्री फडणवीस, मृणाल कुलकर्णी, गिरीजा ओक-गोडबोले यांनीही शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. राज्याच्या जनतेला त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

नववर्षाचा काय नवीन संकल्प असेल यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी 'जनसेवा हा एकच संकल्प' असल्याचे भाव व्यक्त केले. तो कशाप्रकारचा असेल असे विचारले असता जनसेवेचा संकल्प हा जनसेवेचा असतो अशी मिश्किल प्रतिक्रिया देत जनसेवेकरिता जास्तीत जास्त शक्ती ईश्वराने आम्हाला द्यावी, हेच मागणं असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाSocialसामाजिकnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirija Oakगिरिजा ओकMrinal Kulkarniमृणाल कुलकर्णी