हा तर सरकारच्या अपयशाचा सोहळा : ज्योतिरादित्य सिंदिया
By Admin | Updated: May 26, 2016 17:31 IST2016-05-25T23:56:10+5:302016-05-26T17:31:50+5:30
केंद्र सरकारतर्फे सत्तास्थापनेला २ वर्ष पूर्ण केल्याबद्दल आनंद सोहळा आयोजित करण्यात येत आहे

हा तर सरकारच्या अपयशाचा सोहळा : ज्योतिरादित्य सिंदिया
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - केंद्र सरकारतर्फे सत्तास्थापनेला २ वर्ष पूर्ण केल्याबद्दल आनंद सोहळा आयोजित करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात या २ वर्षांत केंद्र शासनाने काहीही विधायक काम केलेले नाही. हा तर सरकारच्या अपयशाचाच सोहळा आहे, या शब्दांत कॉंग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंदिया यांनी टीका केली.
बुधवारी नागपूर विमानतळावर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. केंद्र शासनाचे २ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांची दुरावस्था होत आहे. सोबतच घोटाळेदेखील होत आहेत. अशा स्थितीत ते सोहळा कसला साजरा करत आहेत, असा प्रश्न सिंदिया यांनी उपस्थित केला.
केंद्र शासनाचे २ वर्षांचे प्रगतीपुस्तक पूर्णपणे रिकामे आहे. आता तर जनता त्यांना प्रश्न विचारत आहे आणि मंत्री उत्तर देण्याचे टाळत आहे. केंद्र शासनाची २ वर्षे पूर्णत: अपयशी ठरली आहे, असेदेखील ते म्हणाले.