उत्सव दिवाळीचा ... उत्साह खरेदीचा

By Admin | Updated: November 5, 2015 03:46 IST2015-11-05T03:46:12+5:302015-11-05T03:46:12+5:30

दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव. अवघ्या चार दिवसावर असलेल्या या उत्सवानिमित्त उपराजधानीतील बाजार आठवडाभरापासून

Celebration Diwali ... buy enthusiasm | उत्सव दिवाळीचा ... उत्साह खरेदीचा

उत्सव दिवाळीचा ... उत्साह खरेदीचा

दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव. अवघ्या चार दिवसावर असलेल्या या उत्सवानिमित्त उपराजधानीतील बाजार आठवडाभरापासून हाऊसफुल्ल आहे. आकाशकंदील, पणत्या, दरवाजावर सोडण्यासाठी रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, पणत्या, मिठाई, रांगोळीच्या वैविध्यपूर्ण रंगांसह कपड्यांच्या विविध व्हेरायटीज बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. बारीक दिव्यांची म्युझिकल तोरणं, त्या दिव्यांभोवती फुलं, पानं, फुलपाखरं, कलश असे नवनवीन प्रकार यंदाचे आकर्षण आहेत. क्रिस्टलपासून तयार करण्यात आलेली तोरणं चांगलीच लोकप्रिय होताना दिसतायेत. याशिवाय पाण्यातल्या रांगोळ्या व त्यावर मेणबत्त्यांचेही महिलांना आकर्षण आहे. मण्यांची कलाकुसर असलेल्या रेडिमेड रांगोळ्यांचीही क्रेझ आहे. दिवाळीच्या खरेदीचा नागपूरकरांचा उत्साहही वाखाणण्याजोगा आहे.

Web Title: Celebration Diwali ... buy enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.